नवी दिल्ली : सोने खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. सोने त्याच्या ऑलटाईम उच्चांकी दरापासून नीच्चांकी आले आहे. सोन्यातील घसरण सुरुच आहे. गेल्या दहा दिवसांत सोन्याचा उलटा प्रवास खरेदीदारांसाठी मोठी संधी आहे. गुडरिटर्न्सनुसार, सोन्याचा दरात (Gold Price) आजही मोठी घसरण झाली. आकडेवारीनुसार, देशातील सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्यात 400 रुपयांची तर 24 कॅरेट सोन्याच्या दरात 430 रुपयांची घसरण दिसून आली. या 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम नोंदविला होता. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याने 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. उच्चांकी दरापासून सोने जवळपास 2000 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे गुंतवणुकीची मोठी संधीही उपलब्ध झाली आहे. अमेरिकन फेडरल बँकेच्या कडक भूमिकेमुळे डॉलर (Dollar Index) मजबूत झाला आहे. तर क्रूड तेलाच्या किंमतीही स्थिर आहेत. त्याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने गेल्या महिन्याभराच्या नीच्चांकीस्तरावर पोहचले आहे. अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत आहे. चांदीच्या किंमतीतही (Silver Price) चढउतार होत आहे.
गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या भावात मोठी घसरण दिसून आली. 17 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,550 रुपयांहून 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपयांहून 56,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,730 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,030 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,760 रुपये आहे.
गेल्या दहा दिवसांचा विचार करता, सोन्याने बरीच माघार घेतल्याचे दिसून येते. 7 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याच्या भाव 52,900 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 57,700 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 17 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 52,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,880 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. म्हणजेच सोन्याच्यी किंमतीत जवळपास 700 रुपये ते 900 रुपयांची घसरण झाली.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.