नवी दिल्ली : सोन्याचे दर (Gold Price) सातत्याने वाढत आहे. मध्यंतरी चांदीच्या भावात (Silver Rate) घसरण झाली होती. ऐन लग्नसराईत किंमती वाढल्याने ग्राहकांच्या, सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांच्या (Investors) तोंडचे पाणी पळाले आहे. आज दिवसभरात सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर वधारले होते.
सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) वाढ झाल्याने खरेदीपूर्वी एकदा भावा तपासून घ्या. सोन्याच्या किंमती कितीने वाढ झाली, भावात काय बदल झाला हे पहा. भावात झालेला हा बदल तुम्हाला किती रुपये जास्त लागतील याची आगाऊ कल्पना देईल.
दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅमसाठी 52,000 रुपये असल्याची माहिती, HDFC Securities ने दिला आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सोन्याचे दर 56,000 कडे आगेकूच करत आहेत.
मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्यात 30 रुपयांची तेजी दिसून आली. प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,731 रुपये मोजावे लागले. तर गेल्या व्यापारी सत्रात प्रति 10 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 52,701 रुपये मोजावे लागले. आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली.
मंगळवारी चांदीही लकाकली. गेल्या काही दिवसांपासून चांदीचे दर सातत्याने घसरत होते. चांदीच्या किंमतीत मंगळवारी 856 रुपयांची प्रति किलो वाढ दिसून आली. आज एक किलो चांदीचा दर 61,518 रुपये होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने चकाकले. सोन्यामध्ये मोठी तेजी दिसून आली. सोन्याचे दर 1,741.95 डॉलर प्रति औसवर पोहचले. त्यासोबतच चांदीचा भाव 21.05 डॉलर प्रति औसवर व्यवहार करत होते.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities)विश्लेषक दिलीप परमार यांनी दावा केला की, डॉलर कमकुवत झाल्याने सोन्यामध्ये तेजी दिसून येत आहे. कॉमेक्स बाजारात सोने 1,740 डॉलर प्रति 10 ग्रॅमवर व्यापार करत होते.