नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात सोन्यात घसरण (Gold Down) झाली होती. पण नंतर सोन्याने एकदम उसळी घेतली. सोन्याच्या किंमतीत (Gold Price) आठवडाभरातच जोरदार वाढ झाली. लग्नसराईत पिवळ्याधम्मक सोन्याने लगबगीत असलेल्या वऱ्हाडी मंडळींच्या जीवाला घोर लावला. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव 52,662 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याच्या किंमती 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचल्या. दिवाळीत (Diwali) याच किंमती 50 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या.
या आठवड्यात सोमवारी सोन्याच्या किंमती 52,673 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाल्या होत्या. मंगळवारी सोन्याच्या किंमतीत वृद्धी दिसून आली. या किंमती 52,715 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. बुधवारी हा भाव 52,751 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. त्यानंतरच्या दोन दिवसात किंमती भडकल्या.
तर गुरुवारी सोन्याने जोरदार बॅटिंग केली. सोन्याच्या दरात वृद्धी झाली. सोन्याचे दर 53 हजारांच्या पुढे गेले. गुरुवारी सोने 53,120 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. शुक्रवारी सोन्याच्या किंमती 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. गेल्या आठवड्यात या किंमतीत किंचित घसरण झाली होती.
IBJA Rates नुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमती शुक्रवारी, 52,662 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर या आठवड्यात शुक्रवारी, 2 डिसेंबर 2022 रोजी सोन्याचा भाव 53,611 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. आता पुढील आठवड्यातील सोन्याच्या दराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका आठवड्यात सोने हजारी मनसबदार झाले. सोन्याने जोरदार उसळी घेतली. सोन्याच्या किंमतीत जोरदार उसळी आली. सोन्याच्या दरात आठवडाभरात 949 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली. सोन्यातील तेजी अशीच कायम राहणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
या वर्षी मार्च महिन्यात सोन्याच्या किंमती 54,330 रुपये होत्या. यावर्षी ही किंमत उच्चांकी होती. रशिया-युक्रेन युद्धाच्या सुरुवातीच्या काळात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. पण नंतर मार्च महिन्यात सोन्याच्या किंमतीमध्ये जोरदार उसळी मारली.