नागपूर : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोने, चांदीच्या भावात घट दिसली. उत्तर प्रदेशासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. याचा परिणाम म्हणून शेअर बाजारातून (Stock market) रिकव्हरी होणार नाही. शिवाय मार्चमध्ये लग्नांचा धुमधडाका नाही. म्हणून 7 मार्च ते 11 मार्चदरम्यान सोन्या, चांदीच्या भावात (gold, silver prices) घसरण झाली. मार्चमध्ये लग्नांची (wedding in March) धामधूम नाही. याचा परिणाम गेल्या आठवड्यात सोने, चांदीच्या किमतींवर पाहायला मिळाला. IBJA कडून प्रकाशित आकड्यानुसार, गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात 1 हजार 100 रुपये प्रती दहा ग्राममध्ये घट दिसली. हे आकडे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.
7 मार्च : 24 कॅरेट सोन्याची किंमत 53,595 रुपये प्रती 10 ग्राम होती.
8 मार्च : मंगळवारी सोन्याच्या भावात 47 रुपयांची घट झाली. 53,548 रुपये प्रती 10 ग्राम होते.
9 मार्च : बुधवारी सोन्याचा भाव 407 रुपये कमी झाला. बुधवारी सोनेबाजार बंद होण्याच्या वेली 24 कॅरेट सोन्याचे भाव 53,141 रुपये प्रती 10 ग्राम होता.
10 मार्चला : गुरुवारी निवडणुकीचे निकाल घोषित झाले. या दिवशी 10 ग्राम सोन्याच्या भावात 261 रुपयांची घसरण झाली. 10 मार्चला सोन्याचे भाव 52,880 रुपये प्रती 10 ग्राम होते.
11 मार्च : आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात 418 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 52,462 रुपये प्रती 10 ग्रामवर भाव होते.
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर उपलब्ध आकड्यांनुसार 7 – 11 मार्च या आठवड्यात सोने 1,133 रुपये प्रती ग्राम स्वस्त झाले.
7 मार्च : सोमवारी सोनेबाजारात चांदीची किंमत 70,580 रुपये प्रती किलोग्राम होती.
8 मार्च : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी चांदीच्या किमतीत 310 रुपये किलोग्राम वाढ पाहायला मिळाली.
9 मार्च : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी 56 रुपये प्रती किलोग्राम चांदीच्या भावात घसरण झाली. यामुळं बाजारात चांदीची किंमत 70,834 रुपये प्रतीकिलो झाली.
10 मार्च : गुरुवारी चांदीच्या किंमत 1,019 रुपये कमी होऊन 69,815 रुपये प्रती किलोग्रामवर आली.
11 मार्च : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चांदीची किंमत 102 रुपये प्रती किलोग्राम घसरली. बाजारात चांदीची किंमत 69,713 रुपये प्रती किलोग्राम होती.
अशाप्रकारे आठवडी बाजारात चांदीची किंमत 867 रुपये प्रती किलोग्राम घसरली. हे आकडे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर आधारित आहेत.