Gold Silver Price Today : सोन्याने दाखविला पुन्हा रंग! चांदीत मात्र घसरण, आजचे भाव घ्या जाणून

| Updated on: May 10, 2023 | 11:08 AM

Gold Silver Price Today : आज सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव वधारला तर चांदी स्वस्त झाली आहे. जाणून घ्या आजचा भाव किती आहे, तुमच्या खिशाला किती बसेल झळ..

Gold Silver Price Today : सोन्याने दाखविला पुन्हा रंग! चांदीत मात्र घसरण, आजचे भाव घ्या जाणून
आज किती वाढले भाव
Follow us on

नवी दिल्ली : सराफा बाजारात तुम्ही खरेदीला जाण्यापूर्वीच सोन्याने महागाईची वर्दी दिली, तर चांदीच्या किंमती स्वस्त झाल्या आहेत. यापूर्वी 2 फेब्रुवारी 2023 रोजी आणि 5 एप्रिल 2023 रोजी सोने-चांदीने दरवाढीचा विक्रम नावावर केला आहे. आता सोने 65,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा दावा आहे. तर चांदी लवकरच 90,000 रुपयांच्या घरात जाईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचा सोन्याचा भाव वधारला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या (Gold Silver Price) खरेदीसाठी जाताना शिल्लक रक्कम खिशात घेऊन जा.

आजचा भाव काय
गुडरिटर्न्सनुसार, 10 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 250 रुपयांनी वधारला. आज हा भाव 57,100 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्यात प्रति 10 ग्रॅम 280 रुपयांची वाढ झाली. सकाळच्या सत्रात हा भाव 62,280 रुपये आहे. 9 मे रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 56,750 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 61,900 रुपये होता.

चांदीत आज घसरण
1 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 76,000 रुपये होता. तर आज 6 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,250 रुपये आहे. म्हणजे पाच दिवसांत चांदी किलोमागे 2250 रुपयांची वाढ झाली. 9 मे रोजी एक किलो चांदीचा भाव 78,100 रुपये होता. 10 मे रोजी सकाळच्या सत्रात चांदी किलोमागे 100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,000 रुपये झाला आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची रॉकेट भरारी
यावर्षी चांदी आणि सोन्याच्या किंमतींनी जवळपास 11 टक्क्यांची उसळी घेतली. पण सोन्याच्या वाढत्या भावामुळे ग्राहक, खरेदीदारांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांनी चांदीकडे मोर्चा वळविला आहे. चांदीत येत्या काही दिवसांत मोठी तेजी दिसू शकते. चांदीची मागणी वाढली आहे. चांदीच्या किंमती 9-12 महिन्यात वाढून 85,000 ते 90,000 रुपये प्रति किलोवर पोहचतील, असा अंदाज आहे. त्यामुळे चांदीच्या किंमतीत 20 टक्क्यांची तेजी दिसून येईल.

भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

11 वर्षांत भाव डबल

  1. गेल्या 11 वर्षांतील भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल. सोन्याचा भाव डबल झाला आहे.
  2. 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
  4. एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला
  5. चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली
  6. चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली