जळगाव : सोन्या-चांदीच्या भावात आज (12 ऑगस्ट) मोठी घसरण झली आहे (Gold Rate Decrease). आंतरराष्ट्रीय बाजारात कमोडिटी बाजारात घसरण झाल्याने सोन चांदीचे दर कमी झाले आहेत. सोन्याच्या भावात प्रतितोळे 5 हजाराची घसरण झाली आहे. तर चांदीच्या भावात प्रतिकिलो 14 हजारांची घसरण झाली आहे (Gold Rate Decrease).
सोन्याचा भाव प्रतितोळे 58 हजार वरून घसरुन 53 हजार 500 रुपये वर आले आहे. तसेच चांदीचे भाव 78 हजार रूपये किलो वरून 64 हजार रुपये किलो झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या काहीदिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली होती. ग्राहक येत नसल्यामुळे व्यापाऱ्यांनाही तोटा सहन करावा लागत होता. पण आता सोन्याच्या दरात घट झाल्यामुळे नागरिकांना थोडा फार दिलासा मिळाला आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली होती. 3 ऑगस्टला सोन्याचा भाव 53 हजार 717 रुपये प्रतितोळा होता. 4 ऑगस्टला सोन्याचा भाव वाढून 54 हजार 551 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 5 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 098 रुपये प्रतितोळा होता. 6 ऑगस्टला सोन्याचा भाव 55 हजार 845 रुपये प्रतितोळ्यावर पोहोचला. तर, 7 ऑगस्टला सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 56 हजार 191 रुपये प्रतितोळा भाव गाठला.
संबंधित बातम्या :
Gold Price | सोनं महागलं! पाच दिवसात सोने दरात साडेतीन हजारांची वाढ, तोळ्याचा भाव…
Gold Rate | अवघ्या 24 तासात सोने दरात मोठी वाढ, प्रतितोळ्याचा दर…