नवी दिल्ली : सोन्याची किंमत (Gold Rate Today) शुक्रवारी वाढली आहे. सोनं 250 पेक्षा जास्त रुपयांनी महागलं आहे. दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याची किमत प्रति 10 ग्राम 52 हजार 472 रुपयांवर पोहोचली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीद्वारा (HDFC Securities) ही आकडेवारी देण्यात आली आहे. याआधी सोन्याची किंमती प्रति 10 ग्रॅम 52209 रुपये इतकी नोंदवण्यात आली होती. सोन्यासोबत चांदीही महागली आहे. चांदीच्या किंमती (Silver Rate Today) पाचशे रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजाराच्या घरात गेला आहे. सध्याच्या घडीचा चांदीचा दर हा 67707 रुपये इतका नोंदवण्यात आला होता. याआधी सोन्याचा दर 67 हजार 207 रुपये इतका नोंदवला गेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्यातील तेजीचा परिणाम देशातील सराफा बाजारावरही जाणवतो आहे. वाढत्या सोने चांदीच्या दरांचा फटका ऐन लग्नसराईत होण्याचीही दाट शक्यता आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सोन्याची किंमत ही 52610 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. तर चांदी प्रति किलो 67184 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे.
फ्युचर ट्रेडमध्ये सोन्याच्या किंमतीत 187 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. प्रति दहा ग्रॅम सोन्याची किंमत फ्युचर ट्रेडमध्ये 52600 रुपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे सोन्यापाठोपाठ फ्युचर ट्रेडमध्ये चांदीच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली. चांदीची किंमत 66900 रुपये प्रति किलो इतकी नोंदवण्यात आली आहे.
रशिया युक्रेनमध्ये सुरु असलेल्या तणावपूर्ण स्थितीचा फटका आंतरराष्ट्रीय बाजारवर होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ नोंदवली जात असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. येत्या काळात सोन्याची किंमत 55 हजार रुपयांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त केली जाते आहेत. तर येत्या वर्षापर्यंत सोन्याची किंमत 62 हजार रुपयांपर्यंतही पोहोचू शकते, अशीही भीती व्यक्त केली जाते आहे.