Gold Rate : सहा महिन्यात असा वाढला सोन्याच्या दरवाढीचा ग्राफ; आता आणखी किती झेप घेणार

| Updated on: Jul 03, 2024 | 5:02 PM

Gold Vs Share Market : सहा महिन्यात सोन्याने मोठी घौडदौड केली. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात तर ऐतिहासिक पातळीवर मौल्यवान धातू पोहचला. सोन्याचा दरवाढीचा ग्राफ दिवसागणिक वाढला. आता पुढे सोने आणखी किती झेप घेणार हे समोर येईल.

Gold Rate : सहा महिन्यात असा वाढला सोन्याच्या दरवाढीचा ग्राफ; आता आणखी किती झेप घेणार
सोन्याची मोठी भरारी
Follow us on

या वर्षातील सहा महिने संपले आहेत. या दरम्यान सोन्याने निफ्टीपेक्षा दमदार कामगिरी बजावली आहे. सोन्याने या वर्षातील पहिल्या सहामाहीत 13.37% रिटर्न दिला आहे. तर निफ्टीत या कालावधीत 10.5% तेजी आली आहे. MCX वर सोन्याच्या वायदे बाजारात जवळपास 8,400 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ दिसून आली. तर या काळात सेन्सेक्समध्ये 2,279 अंकांची वाढ झाली आहे. जुलै महिन्यात सोन्याचा वायदा 74,777 रुपयांच्या सर्वकालिक उच्चांकावर पोहचला. आता हा बाजार 71,800 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. मध्यपूर्वेतील तणाव, चीनमधील सोन्याच्या मागणीतील तेजी तर अमेरिकेतली फेडरल रिझर्व्ह व्याज दरातील कपात यामुळे सोन्याच्या किंमतीत तेजी दिसून येईल.

सोन्याची मोठी घौडदौड

गेल्या पाच वर्षांतील सोने आणि निफ्टीतील पहिल्या सहामाहीतील कामगिरी पाहता, सोन्याने जोरदार परतावा दिल्याचे दिसून येईल. वर्ष 2019 आणि 2023 या कालावधीत सोन्याने चार वेळा जोरदार परतावा दिला. यामध्ये 2020 मध्ये सर्वाधिक (13.71%) आणि 2022 मध्ये सर्वात कमी (0.59%), 2021 मध्ये 3.63% नकारात्मक परतावा मिळाला. तर निफ्टीने तीन वेळा (2019, 2021 और 2023) चांगला परतावा दिला आहे. 2021 मधील पहिल्या सहामाहीत निफ्टीने 12% अधिकचा परतावा दिला आहे. 2019 आणि 2023 या पाच वर्षांच्या कालावधीत हा सर्वाधिक परतावा आहे. 2020 मध्ये मार्चमधील कोविड 19 लॉकडाऊनमुळे निफ्टीत 15% घसरण दिसली. तर 2022 च्या पहिल्या सहामाहीत निफ्टीत 9% घसरण दिसली.

हे सुद्धा वाचा

आता कशी असेल घौडदौड?

ऋद्धिसिद्धी बुलियन लिमिटेडचे एमडी पृथ्वीराज कोठारी यांच्या मते फेब्रुवारी आणि एप्रिल दरम्यान सोन्याने गगनभरारी घेतली. या कालावधीत सोन्याने 18 टक्क्यांची रेकॉर्ड भरारी घेतली. सोने आता 71,000-72,000 रुपयांच्या जवळपास मजबूत होत आहे. या कालावधीत सोने 12,000 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारले. बाजारातील परिस्थिती पाहता सोने येत्या एक ते दोन महिन्यात 70,000 रुपयांपर्यंत येईल. 2024 च्या शेवटच्या तिमाहीत सोने पुन्हा उसळी घेण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या अखेर सोने 75,000 रुपये ते 77,000 रुपयांपर्यंत उसळी घेण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. चीनसह अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी सोने खरेदी थांबविल्याने जून महिन्यात सोन्याच्या भावात मोठी उसळी दिसली नाही.