मुंबई | हिवाळा असो उन्हाळा असो किंवा पावसाळा असो, वर्षाच्या 365 दिवस सोने खरेदी सुरुच असते. सोन्याचे दर कितीही चढे असले तरी, प्रत्येक जण आपल्या आर्थिक कुवतीनुसार थोडंफार का होईना पण सोनं खरेदी करत असतो. आता लगीनसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होत आहे. मात्र आज (6 एप्रिल) सोन्याने कहर केला. सोन्याला सोन्याचे दिवस आले. सोन्याने नवा रेकॉर्ड करत विक्रमी उच्चांक गाठला आहे. सोन्याने 61 हजारचा आकडा पार केला आहे. तसेच या वर्षाअखेरीस सोन्याचा दर हा 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे सोने खरेदीचा प्लान असलेल्यांना मोठा धक्का बसला आहे.
10 ग्रॅम सोनं – 60 हजार 980
मुंबईतील 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव
10 ग्रॅम सोनं – 55 हजार 900
दरम्यान 10 ग्रॅम सोन्याचा भाव हा या वर्षाअखेरीस 70 हजारांवर जाण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात युद्ध झाल्यास किंवा इतर घडामोडी झाल्यास सोन्याचा भाव हा 70 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशी अंदाज वजा भीती तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता या सोन्याच्या सततच्या वाढत्या दरांचा खरेदीवर कसा परिणाम होतो, ग्राहक याला कसा प्रतिसाद देतात, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाची होत असलेली घसरण, दिवाळखोरीत निघालेली सिलिकॉन व्हॅली बँक, शेअर मार्केटमध्ये होणारे चढ उतार आणि रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम या कारणांमुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
ग्राहकांची फसवणूक हा प्रकार काही नवीन नाही. सोने खरेदीसाठी प्रत्येक जण बचत करुन पैसे साठवतो. मात्र सोने खरेदी करताना ग्राहकांची फसवणुकीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोने खरेदी करताना काय खबरदारी घ्यायची, हे माहिती असणं महत्वाचं आहे.
सोनं खरेदी करताना दागिन्यावर हॉलमार्क आहे की नाही, हे तपासून पाहा. हॉलमार्क पाहूनच सोनं खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक मोबाईल app ही जारी करण्यात आलं आहे. या एपचं ‘BIS Care App’ असं नाव आहे. या एपच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकतो. तसेच सोनं खरं आहे नकली हे जाणून घेऊ शकता. सोबतच काही तक्रार असेल, तर ती ही यावरुन नोंदवू शकता.
तसेच घर बसल्याही सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. सोने-चांदीचे दर जाणून घेण्यासाठी 8955664433 या मोबाईल नंबरवर मिस्ड कॉल द्यावा. किंवा या नंबरवर मेसेजही करु शकता.