भारतीय संस्कृतीत सोन्याला खास महत्त्व आहे. भारतात सणासुदीला सोने खरेदीची परंपरा आहे. लग्न कार्यात, समारंभात सोने घालण्यात येते. महिला सोन्याची दागदागिने आणि अलंकार अंगावर घालतात. दिवाळीत सोने खरेदीचा मुहूर्त अनेकांनी साधला. काही जण आता दर घसरल्याने सराफा बाजारात गर्दी करत आहेत. भारतात ग्राहक तीन प्रकारचं सोनं खरेदी करतात. त्यात 24 कॅरेट सोन्याला सर्वाधिक महत्त्व आहे. तर काही जण 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याची खरेदी करण्यात येते. सोन्याच्या शुद्धते आधारे सोन्याचे विभाजन होते. सोन्याच्या शुद्धतेनुसार त्यात इतर धातुचा वापर करण्यात येतो.
24 कॅरेट किती शुद्ध?
24 कॅरेट सोने 99.99 टक्के शुद्ध असते. या सोन्यात इतर धातुचा समावेश नसतो. शुद्धता आणि गुणवत्तेमुळे हे सोने महाग असते. सोन्याची शिक्के, तुकडे, बिस्किट तयार करण्यासाठी 24 कॅरेट सोन्याचा उपयोग करतात. तर औषध, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये सुद्धा याचा वापर करण्यात येतो.
22 कॅरेट सोने किती शुद्ध?
22 कॅरेट सोन्यात 91.67 टक्के शुद्ध सोने असते. त्यात इतर 8.33 टक्के धातुंचे मिश्रण असते. या धातुंमध्ये प्रामुख्याने चांदी आणि तांब्याचा वापर होतो. 22 कॅरेट सोने पण शुद्ध मानण्यात येते. हे सोने 24 कॅरेट सोन्यापेक्षा कमी शुद्ध असते. सोन्याची दागिने, आभुषणे तयार करण्यासाठी याच सोन्याचा अधिक वापर होतो. हे दागिने महत्त्वाच्या कार्यक्रमात, समारंभात, सणामध्ये वापरण्यात येतात. हे दागिने वजनाने हलके आणि नरम असतात.
18 कॅरेट सोन्यात इतर धातु किती?
18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने आणि 25 टक्के चांदी,तांब्याचा वापर होतो. 18 कॅरेट सोन्यात इतर धातूंचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याने हा धातू कठोर होतो. हे दागिने, आभुषणे, आंगठी, गळ्यातील चैन रोजच्या वापरासाठी उपयोगी पडतात. त्यामुळे रोजच्या वापरासाठी जे सोन्याचे दागिने तयार होतात, ते 18 कॅरेट सोन्याचे असतात.
14 कॅरेट सोने
14 कॅरेट सोन्यात इतर धातुंची संख्याच अधिक असते. यात 58.3 टक्के शुद्ध सोन्याचा वापर होतो. इतर 41.7 टक्के निकेल, चांदी, जस्त या धातुंचे मिश्रण असते.
हॉलमार्किंगचे दागिने खरेदी करा
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला सोन्याचे शिक्के, दागिने, आभुषणे, बिस्किट, तुकडा कशाची खरेदी करायची ते अगोदर ठरवा. त्यावरील हॉलमार्क (Hallmark on Gold Jewellery) तपासा. केंद्र सरकारने 1 एप्रिल, 2023 रोजीपासून सर्व दागिन्यांवर 6 क्रमांकाच्या हॉलमार्क (Hallmarking Rules) असणे अनिवार्य केले आहे. कोणताही दुकानदार विना 6 क्रमांकाच्या हॉलमार्क शिवाय दागिन्यांची विक्री करू शकत नाही.