नवी दिल्ली : सोने दरवाढीची शिडी झरझर चढत आहे. तर चांदीने मात्र माघार घेतली आहे. या महिन्यात सोन्याने दरवाढीची सलामी दिली आहे. तर चांदीने मात्र अजून मोठी उसळी घेतलेली नाही. अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम दिसून येत आहे. दोन्ही धातू दबावाखाली होते. पण अमेरिकन महागाईचे आकडे समोर येत आहे. डॉलर कमजोर होण्याची चिन्हं दिसताच सोन्याने उडी घेतली. तर चांदी मात्र माघारी फिरली आहे. अमेरिकन डॉलर कमजोर झाला तर फटका बसू शकतो. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक (Federal Reserve Bank) या महिन्यात व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. 0.25 बेसिस पाँईटची वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर सोने-चांदीचा (Gold Silver Price Today) काय मूड असेल हे समोर येईल.
तांब्याला मागणी
सोने-चांदीची चर्चा होत असताना चीनच्या खेळीमुळे तांब्याला जोर चढला आहे. चीनने तांबे खरेदीची मोठी ऑर्डर दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून चीन तांब्याची मोठी आयात करत आहे. स्पेस स्टेशन, कृत्रिम सूर्य, मंगळावरील मोहीम तसेच अनेक उद्योगांसाठी तांब्याची चीनने मोठी आयात केली होती. आता मागणीत पुन्हा वाढवली आहे.
800 रुपयांची दरवाढ
सोन्याने जुलै महिन्यात चांगलीच आगेकूच केली. सोन्याच्या किंमतीत जवळपास 800 रुपयांची दरवाढ झाली. तर चांदीने एकदाच हजारांची झेप घेतली. मे आणि जून महिन्यात दोन्ही धातूंना नवीन विक्रम करता आला नाही. पण जुलै महिन्यात सोन्याने चांगलीच उसळी घेतली. तरीही सराफा बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळली आहे.
असे वाढले दर
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव