नवी दिल्ली : सोने खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी आहे. गेल्या महिन्यातील सर्वोच्च किंमतीपेक्षा त्यांना स्वस्तात सोने खरेदी करता येईल. त्यांना एक तोळ्यामागे मोठी बचत करता येणार आहे. या आठवड्यातील शेवटच्या दिवसात सोन्याच्या भावाने (Gold Price) उसळी घेतली. तर चांदीच्या किंमतीत चढउतार सुरुच होता. शुक्रवारी सोने दिवसभरात 383 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. चांदीच्या किंमतीत केवळ 2 रुपयांची घसरण झाली. त्यापूर्वी चांदीत (Silver Price) तीन हजार रुपयांची वाढ झाली होती. गुडरिटर्न्सनुसार, शनिवारी, 11 मार्च, 2023 रोजी 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 750 रुपये आणि 830 रुपयांनी वधारला.
22 कॅरेट सोने 51,550 रुपयांहून 52,300 रुपये तोळा तर 24 कॅरेट सोने 56,210 रुपयांहून 57,040 रुपयांवर पोहचले. या किंमती सोन्याच्या ऑलटाईम हायच्या जवळपास आल्या असल्या तरी त्यात हजार रुपयांहून अधिकची तफावत आहे. त्यामुळे ग्राहकांना आताही स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. चांदीच्या किंमती अजून अद्ययावत करण्यात आल्या नाहीत. काल हा भाव किलोमागे 65,250 रुपये होता. 2 फेब्रुवारी रोजी चांदी 74,700 रुपये इतका उच्चांकी होती.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.
आठवडाभरात अशा बदलल्या किंमती
चांदीने अशी बदलली चाल