नवी दिल्ली : अमेरिकेत महागाई आटोक्यात आणण्यासाठी व्याजदर वाढविण्यात आली आहे. या दमकोंडीमुळे डॉलर घसरला आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Update) भडकल्या आहेत. सोन्या-चांदीने गेल्या काही दिवसांपासून अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. सोने आणि चांदीच्या किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. जानेवारी ते मार्च महिन्यात सोन्याने 8 टक्के तर चांदीने 12 टक्के परतावा दिला आहे. अवघ्या तीन महिन्यांत एका वर्षाच्या एफडी इतका हा परतावा आहे. यावरुन या दोन्ही मौल्यवान धातूंची गगन भरारी दिसून येते. अजून काही दिवस भावात तेजी राहणार असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सराफा बाजाराकडील वाट वळवली आहे.
आज सकाळचा भाव काय
गुडरिटर्न्सने आज, मंगळवारी सकाळच्या सत्रातील भावांचा लेखाजोखा मांडला आहे. त्यानुसार, सकाळाच्या सत्रात आज दोन्ही धातूंमध्ये घसरण झाली. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे भाव 390 रुपयांनी घसरले. 22 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव आज 55,550 रुपये आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 430 रुपयांनी स्वस्त झाली. आज हा भाव 60,580 रुपये आहे.
कालचा भाव काय
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, काल 10 एप्रिल रोजी 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 60,355 रुपये होती. 23 कॅरेट सोन्याचा भाव 60,115 रुपये, 22 कॅरेट सोने 55,285 रुपये, 18 कॅरेट सोने 45,266 रुपये, तर 14 कॅरेट सोने 35,307 रुपये एक तोळ्याचा भाव आहे. आयबीजेए शनिवार, रविवार सोन्या-चांदीचे भाव घोषीत करत नाही. तसेच केंद्र सरकार ज्या दिवशी सुट्टी घोषीत करते त्या दिवशी पण नवीन भाव जाहीर करण्यात येत नाहीत. आता भाव सोमवारी जाहीर करण्यात येईल.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
हॉलमार्कचा संबंध
24 कॅरेट सोने शुद्ध मानण्यात येते. त्यावर 999 अंक चिन्हांकित असते. या सोन्यापासून दागिने तयार करण्यात येत नाही. 22 कॅरेट चे दागिने असतील तर त्यावर 916 अंक चिन्हांकित असतो. 21 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 875 हा अंक चिन्हांकित करण्यात येतो. 18 कॅरेटच्या ज्वेलरीवर 750 अंक असतो. तर 14 कॅरेटच्या दागिन्यावर 585 अंक असतो.
किती शुद्धता