सोन्याच्या किंमतीत भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

| Updated on: Jan 16, 2021 | 3:55 PM

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली. याच गुंतवणूकदारांना आता मोठा फायदा होणार आहे.

सोन्याच्या किंमतीत भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर
Follow us on

नवी दिल्ली : गुंतवणूकीसाठी सोने-चांदी हे नेहमीच सुरक्षित समजले जाते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात जगभरातील गुंतवणूकदारांनी सोने-चांदीत गुंतवणूक केली. याच गुंतवणूकदारांना आता मोठा फायदा होणार आहे. कारण सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून वधारायला सुरुवात झाली आहे. आज 1 ग्रॅम सोन्यासाठीचा दर 50 हजार 541 एवढा आहे. तर चांदीच्या भावातही दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे. (Gold Silver Price on monday 28 Dec)

गेल्या चार दिवसांपासून सोन्याच्या किमतीत लगातार वाढ होत आहे. 25 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी 49 हजार 710 रुपये एवढा होता. तोच भाव वाढून आता सोन्याच्या 50 हजार 500 रुपयांचा टप्पाही पार केलाय.

सुवर्णनगरी जळगाव

सोने दर- 51 हजार 410 रुपये तोळा, चांदी दर- 69 हजार 208 रुपये प्रति किलो

पुणे

सोने दर- 51 हजार 500 रुपये प्रति तोळा, चांदी दर- 68 हजार 200 रुपये प्रति किलो

कोल्हापूर

सोने दर- 51 हजार 500 रुपये प्रति किलो,  चांदी- 66 हजार 100

MCX वर सोन्याचा दर हा 50 हजारांच्या पार आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा दर 1880 डॉलर इतका पोहोचला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत सोन्याच्या भाव चांगलाच वाढण्याची शक्यता आहे.

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला देशांतर्गत सोन्याचा दर हा प्रति दहा ग्रॅम 39100 रुपये इतका होता. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये हा सोन्याचा दर 1517 डॉलर प्रति औंस इतका होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सोने-चांदीच्या किंमतीत कमालीची वाढ झाली. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव हा प्रति दहा ग्रॅम 56 हजार 191 रुपये इतका झाला. म्हणजेच वर्षभरात सोन्याची किंमत 40 टक्क्यांनी वाढली. दरम्यान सध्याच्या किंमतीनुसार त्यात 30 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

प्रतितोळा 63 हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता

काही तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशांतर्गत मार्केटमध्ये सोन्याचे दर हा प्रति दहा ग्रॅम 63 हजारपर्यंत पोहोचू शकतो. तसेच आर्थिक मंदीचा सामना करण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांनी व्याज दर कमी केला आहे. त्याशिवाय व्यवसायांना पाठिंबा देण्यासाठी पॅकेजही जाहीर करण्यात आले. तसेच दर कपातीला 2019 च्या उत्तरार्धात सुरु झाल्याने अनेक गुंतवणूकदार सोन्याकडे आकर्षित झाले आहेत.

येत्या वर्षात देशांतर्गत सोन्याचे भाव हे कमीत कमी 60 हजारांपर्यंत पोहोचू शकतात. तर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये याचा भाव हा 2200 डॉलर इतका होऊ शकतो. मात्र यासाठी रुपयामध्ये स्थिरता असणे गरजेचे आहे. मात्र जर रुपया डॉलरच्या तुलनेत घसरला तर याबाबतचा अंदाज पुढे-मागे होऊ शकतो. (Gold Silver Price on monday 28 Dec)

हे ही वाचा

स्वस्तात सोने खरेदी करायचंय, केंद्र सरकार देतंय या वर्षातली शेवटची संधी…!