नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीने गेल्या आठवडाभरात मोठी उचल खाल्ली आहे. किंमतींनी उच्चांकी झेप घेतली आहे. जागतिक बाजारात सोने आणि चांदीने पहिल्यांदा सात महिन्यांतील उच्चांक गाठला आहे. किंमती 3 टक्क्यांनी वाढल्या. भारतीय सराफा बाजारात लागलीच त्याचे परिणाम दिसून आले. सोने-चांदीने (Gold Silver Price Today 15 October 2023) अगोदरच गरबा सुरु केला आहे. किंमती लवकरच भडकण्याची शक्यता आहे. एक आठवड्यापूर्वी दोन्ही धातून दिवाळीपर्यंत स्वस्त होण्याचा अंदाज बांधल्या जात होता.
आठवडाभरात भावात वृद्धी
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दोन्ही धातूच्या किंमती जाहीर करते. त्यानुसार एका आठवड्यात सोन्यात 1800 रुपयांची तर चांदीमध्ये 2500 रुपयांची वृद्धी झाली. 6 ऑक्टोबरला 24 कॅरेट सोन्याचा भाव 56,555 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर या 13 ऑक्टोबर रोजी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,396 रुपये होता. या किंमती 1,841 रुपयांनी वधारल्या. चांदीचा भाव 67,204 रुपयांहून 69,731 रुपयांवर पोहचला. चांदी एका किलोमागे 2,527 रुपयांनी वाढली.
IBJAकडून भाव जाहीर नाही
भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.
सोन्याची किंमत काय
गुडरिटर्न्सनुसार, आठवडाभरात सोने झपाट्याने वाढले. 6 ऑक्टोबरला सोने 70 रुपयांनी वधारले होते. 8 ऑक्टोबरला 440 रुपयांची वाढ झाली. 9 ऑक्टोबर रोजी 220 रुपयांनी किंमती वधारल्या. 10 ऑक्टोबर रोजी किंमतीत 330 रुपयांची वाढ झाली. 1600 रुपयांपेक्षा अधिकची झेप सोन्याने घेतली आहे. 22 कॅरेट सोने 54,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,060 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.
चांदीत मोठी वाढ
चांदीत या महिन्याच्या सुरुवातीला पडझड झाली होती. आता युद्धाचा परिणाम दिसून येत आहे. 7 ऑक्टोबर रोजी चांदी 1500 रुपयांनी वाढली. तर 9 ऑक्टोबर रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 12 ऑक्टोबर रोजी किंमती 500 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 72,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट असा आहे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 58,396 रुपयांपर्यंत घसरले. 23 कॅरेट 58,163 रुपये, 22 कॅरेट सोने 53,490 रुपये, 18 कॅरेट 43,797 रुपये, 14 कॅरेट सोने 34,161 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,731 रुपयांपर्यंत झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.