Gold Silver Rate Today : सोने-चांदी उच्चांकी भरारी, गुंतवणूकदारांच्या पळाले तोंडचे पाणी

| Updated on: Oct 21, 2023 | 8:38 AM

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने दरवाढीची गिरकी घेतली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. दसरा हसरा कसा होईल, अशी चिंता खरेदीदारांना पडली आहे. अगदी 15 दिवसांपूर्वी मौल्यवान धातूच्या किंमती कमी होतील, असा अंदाज असताना इस्त्राईल-हमास युद्धाने ग्राहकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदी उच्चांकी भरारी, गुंतवणूकदारांच्या पळाले तोंडचे पाणी
Follow us on

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : सध्या भारतात सणावाराची लगबग सुरु आहे. नवरात्री, गरब्याने देशात रंगत आणली आहे. ग्राहकांना खरेदीचे वेध लागले आहे. या मंगलमय वातावरणात खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सर्वच जण लगबग करत आहेत. अनेक जण सोने-चांदीत गुंतवणूक करतात. पण यंदा दसऱ्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. गेल्या चार महिन्यानंतर सोने-चांदीने लांबचा पल्ला गाठला आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात मौल्यवान धातूने रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत. मध्यंतरी सोने-चांदीला उंच भरारी घेता आली नाही. पण दोन दिवसांत सोने-चांदीने (Gold Silver Price Today 21 October 2023) आकाशी झेप घेतली. भावात इतकी वाढ झाली.

तीन दिवसांत 1600 रुपयांची वाढ

गुडरिटर्न्सनुसार, आठवड्याची सुरुवात पडझडीने झाली. सुरुवातीच्या दोन दिवसांत किंमतीत 500 रुपयांची घसरण झाली होती. 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी वधारले. 19 ऑक्टोबर रोजी सोन्याने 270 रुपयांची उसळी घेतली. 19 ऑक्टोबर रोजी सोन्यात 270 रुपयांची दरवाढ झाली. तर 20 ऑक्टोबर रोजी सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 780 रुपयांची आघाडी घेतली. या तीन दिवसांत सोन्यात 1590 रुपयांची तेजी आली. 22 कॅरेट सोने 56,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,690 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. या दरवाढीने दसरा कसा हसरा होईल, अशी चिंता ग्राहकांना लागली आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी इतकी वाढली

चांदीत आठवड्याच्या सुरुवातीला घसरण झाली. 17 ऑक्टोबरला चांदीत 500 रुपयांनी उतरली. त्यापूर्वी भाव जैसे थे होते. बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी किंमतींनी 1 हजार रुपयांची वाढ झाली. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 20 ऑक्टोबर रोजी भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,693 रुपये होते. 23 कॅरेट 60,450 रुपये, 22 कॅरेट सोने 55,595 रुपये, 18 कॅरेट 45,520 रुपये, 14 कॅरेट सोने 35,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,991 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.