मुंबई/नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजाराती तेजीचा हलकासा परिणाम सोन्या-चांदीच्या (Gold and Silver price) दरांवर दिसत आहे. सोने दरात (Gold Price today) आज दहा रुपयांची कपात झाली. जर आज तुम्हाला 22 कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तोळ्याला 44 हजार 920 रुपये तर 24 कॅरेट सोन्यासाठी 45 हजार 920 रुपये द्यावे लागतील.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीचा परिणाम MCX वर दिसत आहे. MCX वर सोने दरात 136 रुपयांची तेजी पाहायला मिळाली. आज सकाळी बाजाराच्या सुरुवातील 10.25 वाजता MCX वरील सोन्याचा तोळ्याचा भाव 47887 रुपये इतका होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनेदरात 2.85 डॉलरने तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे सोने दर 1,834.15 रुपयांनी वधारल्याचं चित्र होतं. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर सोने दराने गाठलेला हा उच्चांक होता. दुसरीकडे चांदी दरात 0.348 डॉलरची तेजी होती.
चांदीच्या दरातही आज मोठी वाढ पाहायला मिळाली. MCX वर सकाळी 10.40 च्या सुमारास जुलै डिलिव्हरीच्या चांदी दरात 834 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्यामुळे चांदीचा दर 72 हजार 263 वर पोहोचला.
आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारातही तेजी पाहायला मिळाली. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर सलग चौथ्या सत्रात शेअर मार्केटमध्ये तेजीचं चित्र आहे.
डॉलरच्या तुलनेत सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवशी एमसीएक्सवरील (MCX) सोन्याचे वितरण प्रति दहा ग्रॅम 47760 रुपयांवर बंद झाले. 30 एप्रिल रोजी जून डिलिव्हरीच्या सोन्याचे भाव (Gold Rate) 46737च्या पातळीवर बंद झाले होते. अशा प्रकारे, मे महिन्यात सोन्याच्या भावात आतापर्यंत 1023 रुपयांनी वाढ झाली आहे
संबंधित बातम्या
Gold Rate Today: कोरोना संकटात सोने पुन्हा एकदा महागले, 10 ग्रॅम सोन्याचे भाव काय?
Gold Price Today | मे महिन्यात सोने 1000 रुपयांनी महागले, गुंतवणुकीआधी जाणून घ्या ताजे दर