Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरुच, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…

| Updated on: Feb 01, 2021 | 6:11 PM

सोन्या-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण सुरु आहे. (Gold Silver price today)

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात घसरण सुरुच, खरेदीचा विचार करताय? तर, वाचा आजचे दर…
Gold Silver Price Updates
Follow us on

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठी घसरण झाल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळे भारतातील मौल्यवान धातूच्या किंमती घसरल्या. मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा दर रविवारच्या तुलनेत 851 रुपयांची घसरण होऊन 48 हजार 245 वर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिकन डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. स्पॉट सोन्याचे 0.4 टक्क्यांच्या घसरणीसह दर प्रति औंस 1,858.45 डॉलर होता. तर चांदीचा भाव 29.29 डॉलर प्रति औंस एवढा राहिला. (Gold Silver price today on 1st February 2021 Maharashtra Mumbai Pune latest rates and updates)

?मुंबईतील सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47300 रुपये
24 कॅरेट सोने : 48,245 रुपये
चांदीचे दर : 69500 रुपये (प्रतिकिलो)

?पुणे सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47, 300 रुपये
24 कॅरेट सोने : 48, 245 रुपये
चांदीचे दर : 69900 रुपये (प्रतिकिलो)

?अहमदाबादमधील सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 48320 रुपये
24 कॅरेट सोने : 51320 रुपये
चांदीचे दर : 73300 रुपये (प्रतिकिलो)

(Gold Silver price today on 1st February 2021 Maharashtra Mumbai Pune latest rates and updates)

?बंगळुरुतील सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 46000 रुपये
24 कॅरेट सोने : 50180 रुपये
चांदीचे दर : 70300 रुपये (प्रतिकिलो)

?चेन्नईतील आजचे सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 46250 रुपये
24 कॅरेट सोने : 50450 रुपये
चांदीचे दर : 79200 रुपये (प्रतिकिलो)

?दिल्लीतील आजचे सोन्या-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 48150 रुपये
24 कॅरेट सोने : 52520 रुपये
चांदीचे दर : 73300 रुपये (प्रतिकिलो)

बजेटच्या दिवशी सोने स्वस्तात खरेदी करण्याची संधी

1 फेब्रुवारीला सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीमच्या (Sovereign Gold Bond Scheme) 11 व्या सिरीजचे सबस्क्रिप्शन ओपन होत आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने या स्कीमची इश्यू प्राईस 4,912 रुपए प्रति ग्रॅम इतकी निश्चित केली आहे. तुम्ही या स्कीममध्ये 1 ते 5 फेब्रुवारी या काळात गुंतवणूक करु शकता.

सोने आणि चांदी अजून स्वस्त होणार?

आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 मध्ये रत्न आणि ज्वेलरी इंडस्ट्रीजला मोदी सरकारकडून मोठ्या आशा आहेत. केंद्र सरकारने सोन्यावरील सीमा शुल्क कमी करावे, अशी उद्योगजगताला अपेक्षा आहे. टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (टीसीएस) परत मागे घ्या. पॉलिश केलेले मौल्यवान आणि अर्ध मौल्यवान रत्नांवर आयात शुल्क कमी करावे, अशी या उद्योगजगताची इच्छा आहे. अखिल भारतीय रत्न आणि ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (जीजेसी) चे अध्यक्ष असलेल्या इंडिया टीव्हीच्या अहवालानुसार दागिन्यांच्या व्यवसायातील उच्च आयातीवरील करांच्या नकारात्मक परिणामाचे सरकारने आकलन केले पाहिजे. त्यांनी कस्टम ड्युटी 12.5 टक्क्यांवरून 4 टक्क्यांवर आणण्याची मागणी केलीय. जर असे झाले तर सोने-चांदी स्वस्त होऊ शकते. (Gold Silver price today on 1st February 2021 Maharashtra Mumbai Pune latest rates and updates)

संबंधित बातम्या:

Gold Price Today : सोन्याच्या भावांमध्ये मोठी घसरण, जाणून घ्या आजचे ताजे भाव

  Silver Rate Today : सोने-चांदीत गुंतवणुकीची सुवर्णसंधी, दरात पुन्हा घसरण, सध्याचे दर काय?