मुंबई : चार दिवसांत आज (21 मे) पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरले आहेत. सलग तिसऱ्यांदा सोन्याच्या किंमती खाली उतरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय किंमतीतील घसरणीमुळे शुक्रवारी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) जून वायदा सोन्याच्या किंमती (Gold Price) 0.40 टक्क्यांनी घसरल्या. त्याच वेळी जुलै वायदा चांदीच्या किंमतीत (Silver Price) 0.80 टक्क्यांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इक्विटी मार्केटमधील वाढीदरम्यान सोन्याच्या किंमती खाली आल्या. परंतु, डॉलरच्या घसरणीमुळे ही घट मर्यादित राहिली (Gold Silver Price today on 21 May 2021 MCX Rates).
सोन्याचे नवे दर (Gold Price on 21 May 2021): शुक्रवारी, एमसीएक्सवरील जून वायदा सोन्याची किंमत 186 रुपयांनी घसरून 48358 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली.
चांदीचे नवे दर (Silver Price on 21 May 2021) : त्याच वेळी एमसीएक्सवर जुलै वायदा चांदीचा भाव 525 रुपयांनी घसरून 71,779 रुपये प्रतिकिलोवर आला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात महगाई वाढीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. स्पॉट सोन्याचे दर 0.2 टक्क्यांनी घटून ते 1,872.21 डॉलर प्रति औंस झाले. तथापि, या आठवड्यात सोन्याच्या भावात दीड टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच चांदी 0.1 टक्क्यांनी घसरून 27.72 डॉलर प्रति औंस झाली.
सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत (Sovereign Gold Bond Scheme) गुंतवणूक करण्याची आजची शेवटची संधी आहे. ही योजना 17 मेपासून गुंतवणूकीसाठी खुली झाली होती.
सॉवरेन गोल्ड बाँड खरेदी करण्यासाठी ऑनलाइन किंवा डिजिटल पैसे भरणाऱ्यांना बाँडच्या किंमतीत प्रति ग्रॅम 50 रुपये सूट मिळेल (Gold Silver Price today on 21 May 2021 MCX Rates).
हे बाँड्स, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेडकडून खरेदी करता येतात.
सोन्याची किंमत ठरविणार्या घटकांविषयी बोलताना यामध्ये मागणी आणि पुरवठा, रुपया आणि डॉलरचा विनिमय दर आणि जागतिक बाजारपेठेतील सोन्याची किंमत, महागाई, आयात शुल्क, जीएसटी इत्यादींचा समावेश आहे. जीएसटी आणि इतर स्थानिक कर राज्यानुसार बदलू शकतात. काही व्यवसाय संस्था रिझर्व्ह बँकेने दिलेला दरही स्वीकारतात. अलीकडील काळात सोन्याच्या किमतींबद्दल लोकांमध्ये चर्चा वाढलीय. याकडे आता लक्ष वेधले जाऊ शकते, परंतु वेगवेगळ्या दुकानात सोन्याच्या किमतींमध्ये फरक ही एक सामान्य बाब आहे.
(Gold Silver Price today on 21 May 2021 MCX Rates)
‘या’ बँकेने 4 नवी क्रेडिट कार्डे आणली बाजारात, आता किराणा ते बिल भरण्यापर्यंत मिळणार पॉइंट्स
RBI ने एकाच वेळी 3 बँकांना ठोठावला जबरदस्त दंड, तुमच्या खात्यावर परिणाम काय?
आनंदाची बातमी! PNB च्या कोट्यवधी ग्राहकांना गिफ्ट, बँकेनं सर्व्हिस चार्ज घटवले, पटापट तपासा#pnb #PNBATM #PNBcustomer #PNBcustomeraccounthttps://t.co/JRlzUDgVom
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 20, 2021