Gold Rate Today | डॉलरच्या तुलनेत सोन्याची चमक वाढली, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर

| Updated on: Apr 29, 2021 | 12:20 PM

डॉलरच्या दरांत सतत घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price) आज (29 एप्रिल) वाढ दिसून येत आहे.

Gold Rate Today | डॉलरच्या तुलनेत सोन्याची चमक वाढली, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे नवे दर
सोने पुन्हा स्वस्त.
Follow us on

मुंबई : डॉलरच्या दरांत सतत घसरण आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हने सुलभ चलन धोरण सुरू ठेवण्याच्या घोषणेमुळे सोन्याच्या किंमतीत (Gold Price) आज (29 एप्रिल) वाढ दिसून येत आहे. एमसीएक्सवर (MCX) जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा दर सकाळी 10.21 वाजता 116 रुपयांच्या वाढीसह 47209 च्या पातळीवर व्यापार करत होता. बुधवारी हा दर 47093 च्या पातळीवर बंद झाला होता आणि आज 47245 रुपयांच्या पातळीवर उघडला. 47299 रुपये प्रति दहा ग्रॅम ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे आणि 47205 रुपये हा सर्वात कमी दर आहे. ऑगस्ट डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढून 47492 रुपयांच्या पातळीवर व्यापार करत आहे (Gold Silver Price Today on 29 April 2021 MCX rates).

US Dollar Index वर डॉलरमध्ये सतत घसरण होत आहे. यावेळी डॉलर 0.053 (-0.06%) च्या घसरणीसह 90.540 च्या पातळीवर खाली आला होता. डॉलरच्या तुलनेत एमसीएक्सवर जुलै डिलिव्हरीसाठीच्या चांदीची किंमत (Silver Price) 627 रुपयांच्या तेजीसह 69670 रुपयांवर होती. त्याचप्रमाणे मे डिलिव्हरीसाठीच्या चांदीचा दर 664 रुपयांनी वाढून 68450 रुपये प्रतिकिलो होता. 10 वर्षाच्या यूएस बाँड यील्डमध्येही आज घसरण दिसून येत आहे. सध्या हे प्रमाण 1.61 टक्के आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. जून डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचे भाव यावेळी 11.15 डॉलर (+ 0.63%)च्या तेजीसह 1785.05 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत होता. यावेळी चांदीच्या वितरणातही तेजी दिसून येत आहे. यावेळी चांदीचा दर 0.335 डॉलर (+1.28%)च्या वाढीसह 26.420 डॉलर प्रति औंसवर ट्रेड करत होता. एका औंसमध्ये 28.34 ग्रॅम असतात.

रुपया 26 पैशांनी मजबूत

आज सकाळी डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी वाढून 74.10च्या पातळीवर उघडला. बुधवारी रुपया 74.36च्या पातळीवर बंद झाला होता. रिलायन्स सिक्युरिटीच्या मते, देशांतर्गत शेअर बाजार अजूनही मजबूत आहे, यामुळे रुपयालाही आधार मिळाला आहे (Gold Silver Price Today on 29 April 2021 MCX rates).

या महिन्यात 4 हजारांनी महागले सोने

या महिन्यात भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीत 4 हजार रुपयांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. जागतिक बाजारपेठेतील रिकव्हरीमुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीस, अमेरिकन बॉन्ड यील्ड्समध्ये तेजीमुळे सोने 44000 त्या स्तरावर पोहचले होते. ज्यामुळे सेप-हेवन एसेटला धक्का बसला होता. परंतु, अमेरिकन बाँड यील्ड्सच्या मंदीसोबतच अमेरिकन डॉलरही घसरल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात आज अमेरिकन डॉलरच्या किंमतीत मंदीमुळे आणि यूएस ट्रेझरी यिल्ड्समध्ये घसरण झाल्यामुळे सोने 1,800 डॉलरच्या पातळीवर पोहोचले.

विक्रमी उच्चांकापेक्षा 9000 रुपये स्वस्त

सध्या सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली असली, तरी ती अद्याप विक्रमी उच्चांकापेक्षा सुमारे 9000 रुपये कमी आहे. वास्तविक, कोरोनाच्या पहिल्या लाटेने सोन्याच्या किंमतींमध्ये एक नवीन विक्रम स्थापित केला. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे भाव 56000च्या पातळीवर गेले होते, ते आता घसरून प्रति दहा ग्रॅम 47 ते 48,000 पर्यंत खाली आले आहे.

(Gold Silver Price Today on 29 April 2021 MCX rates)

संबंधित बातम्या

Recurring Deposit Rates: RD मध्ये गुंतवणूक करायचीय, मग इथे मिळणार सर्वोत्तम व्याज

Gold Price Today | सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किंमती घसरल्या, आठवडाभरात 1300 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…