नवी दिल्ली : सोने-चांदीच्या किंमतीतील चढउतार हा सोनेरी खेळ ठरला आहे. पण गेल्या पंधरवाड्यापासून मौल्यवान धातूमध्ये घसरणीचे सत्र सुरु आहे. त्यात चांदीने घसरणीतच एक रेकॉर्ड नोंदवला आहे. 24 मे आणि 20 मे हे दोन दिवस वगळता सोने-चांदीने उसळी घेतली नाही. अनुक्रमे प्रति 10 ग्रॅम 250-260 रुपयांची आणि 500-550 रुपयांची दरवाढ या दिवशी झाली होती. गेल्या दहा दिवसांत सोन्यामध्ये जवळपास 1800 रुपये प्रति 10 ग्रॅमची घसरण दिसून आली. त्यामुळे सोने खरेदीची लगीनघाई तुम्ही साधायला हवी. सोने आणि चांदीच्या किंमतीवर (Gold Silver Price) सध्या अमेरिकेतील घडामोडींचा परिणाम होत आहे. अमेरिका कर्ज बुडविते की त्यातून मार्ग काढते यावर किंमतींचा हा खेळ अवलंबून असेल.
दिवाळखोरीचा परिणाम
अमेरिकेने दिवाळखोरी जाहीर केली तर त्याचे भयावह परिणाम होतील. व्हाईट हाऊसच्या अर्थतज्ज्ञानुसार, यामुळे अमेरिकतील 83 लाख नोकऱ्या धोक्यात येतील. अमेरिकन शेअर बाजाराला फटका बसेल. अमेरिकेचा आर्थिक विकास दर गडगडेल. जगात आर्थिक मंदी येईल. सोने-चांदीच्या किंमती भडकतील. पेट्रोल-डिझेलवर पण त्याचा परिणाम होईल.
आजचा भाव काय
goodreturns नुसार आज सोन्यात सकाळच्या सत्रात प्रति 10 ग्रॅमची 10 रुपयांची घसरण झाली. गुरुवारी 450-490 रुपयांची घसरण झाली होती. 22 कॅरेटचा भाव 55,940 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, सकाळच्या सत्रात भावात घसरण दिसून आली. IBJA नुसार, गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,361 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर 22 कॅरेटचा भाव 55,291 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर एक किलो चांदीचा भाव 73,050 रुपये आहे.
24, 23, 22 कॅरेटचा भाव
ibjarates.com नुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,361रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 23 कॅरेटचा भाव 60,119 रुपये तर 22 कॅरेटचा भाव 55,291 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 18 कॅरेट सोन्याचा भाव 45,271रुपये होता. हे भाव काल संध्याकाळचे आहेत.
भाव एका मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.