Gold Silver Rate Today : सोने-चांदीने तोडले रेकॉर्ड, दिवाळीपूर्वी करावी का खरेदी

| Updated on: Oct 22, 2023 | 8:41 AM

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने गेल्या पंधरवाड्यात मोठा पल्ला गाठला आहे. विक्रमी तेजीने ग्राहकांचे डोळे पांढरे झाले आहे. मे, जून महिन्यात सोने-चांदीत नरमाई होती. जुलै महिन्यात चढउताराचे सत्र दिसून आले. सप्टेंबरमध्ये दोन्ही धातूंना कमाल दाखवता आली नाही. ऑक्टोबरमध्ये सोने-चांदीने उच्चांकी भरारी घेतली.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने तोडले रेकॉर्ड, दिवाळीपूर्वी करावी का खरेदी
Follow us on

नवी दिल्ली | 22 ऑक्टोबर 2023 : दसरा-दिवाळीपूर्वीच सोने-चांदीच्या किंमतीत तेजी आली. थंड पडलेल्या सराफा बाजारात यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वर्षी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दोन्ही धातूंनी रेकॉर्ड केले आहेत. त्यानंतर मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र होते. मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात या धातूंना रेकॉर्ड करता आलेला नाही. जुलै महिन्यात चांगली तेजी दिसून आली होती. आता या दहा दिवसांत सोने-चांदीने (Gold Silver Price Today 22 October 2023) कमाल केली आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याने 1800 रुपयांची झेप घेतली आहे. तर चांदीने 1200 रुपयांची झेप घेतली आहे. मग दिवाळीपूर्वी मौल्यवान धातूची खरेदी करावी की थांबावे?

चार दिवसांत 1800 रुपयांनी महागले

गुडरिटर्न्सनुसार, सोमवार, मंगळवारी सोने घसरले होते. त्यानंतर मात्र सोन्याने मोठी उसळी घेतली. 18 ऑक्टोबर रोजी सोने 540 रुपयांनी, 19 ऑक्टोला 270 रुपयांनी आणि 19 ऑक्टोबर रोजी 270 रुपयांची दरवाढ झाली. तर 20 ऑक्टोबर रोजी सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडत 780 रुपयांची आघाडी घेतली. 21 ऑक्टोबरला सोन्यात 210 रुपयांची तेजी आली. आता 22 कॅरेट सोने 56,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 61,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीचा लांब पल्ला

या आठवड्याच्या सुरुवातील चांदीत घसरण झाली होती. बुधवारपासून त्यात तेजी आली. 18 ऑक्टोबर रोजी किंमतींनी 1 हजार रुपयांची वाढ झाली. 19 ऑक्टोबर रोजी 500 रुपयांची घसरण झाली. 21 ऑक्टोबर रोजी 1200 रुपयांनी दर वधारले.गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 60,693 रुपये होते. 23 कॅरेट 60,450 रुपये, 22 कॅरेट सोने 55,595 रुपये, 18 कॅरेट 45,520 रुपये, 14 कॅरेट सोने 35,505 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 71,991 रुपये आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

दिवाळीपूर्वी करावी खरेदी?

इस्त्राईल-हमास युद्धात आता नरमाईचे सूर आळवले जात आहेत. इराण आणि जॉर्डन वगळता आखाती देश थेट युद्धात उतरण्याची शक्यता कमी झाल्याचे चित्र आहे. पण भारतात आता सणासुदीचा काळ असल्याने सोने-चांदीची मागणी वाढली आहे. यु्द्धाचे चित्र पालटल्यास कदाचित किंमतींवर परिणाम होऊ शकतो. पण मागणी वाढत असल्याने या किंमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.