नवी दिल्ली | 2 डिसेंबर 2024 : सोने-चांदीमुळे गुंतवणूकदारांचे भाग्य उजळले. गेल्या वर्षाचा विचार करता ग्राहकांना लॉटरी लागली. एकाच वर्षात सोने 10 ग्रॅममागे 8779 रुपयांचा फायदा तर चांदीने एका किलोमागे 7200 रुपयांची कमाई करुन दिली. पण सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात तितकाचा जादा दाम मोजावा लागला. त्यांच्या खिशाला झळ बसली. त्यांनी दागिने विक्रीचा विचार केला तरी डागी दागिन्याचे वजन घटल्याने त्यांना ठोक गुंतवणूकदारांइतका परतावा मिळणार नाही. त्यांना घटीमुळे कमी पैसा मिळेल. गेल्या आठवड्यात शुक्रवारी पहिल्यांदा सोने-चांदीच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. नवीन वर्षात अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 2 January 2024)..
नवीन वर्षात असा आहे भाव
गेल्या वर्षातील शेवटच्या आठवड्यात 700 रुपयांनी सोने महागले. तर त्यात अखेरच्या दिवशी 400 रुपयांची घसरण झाली. नवीन वर्षात सोन्याच्या किंमतीत मामुली वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, गेल्या तीन दिवसांत किंमतीत फारशी वाढ झाली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत आली स्वस्ताई
2023 मधील शेवटच्या आठवड्यात चांदीत 1100 रुपयांची दरवाढ झाली. तर 29 डिसेंबर रोजी भाव 1200 रुपयांनी घसरले. त्यानंतर भावातील अपडेट समोर आली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,600 रुपये आहे. एका वर्षात चांदीने तगडा रिटर्न दिला आहे. चांदीने एका किलोमागे ग्राहकांना 7200 रुपयांची कमाई करुन दिली.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 63,352 रुपये, 23 कॅरेट 63,098 रुपये, 22 कॅरेट सोने 58,030 रुपये झाले. 18 कॅरेट 47,514 रुपये, 14 कॅरेट सोने 37,061 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,705 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.