नवी दिल्ली | 1 March 2024 : या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. चांदीतही आठवड्याच्या सुरुवातीला पडझड पहायला मिळाली. चांदी जवळपास हजार रुपयांनी स्वस्त झाली होती. आता चांदी महागली आहे. गेल्या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र होते. आता आठवड्याच्या अखेरच्या सत्रात मौल्यावान धातू काय रंग दाखवतात, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आह. सोन्याची किंमत किंचित कमी झाली, तर चांदी 300 रुपयांनी वधारली आहे. सोने-चांदीची (Gold Silver Price Today 1 March 2024) जाणून घ्या किंमत…
सोन्याचा ग्राहकांना दिलासा
गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना चकमा दिला. प्रत्येक दिवशी किंमती बदलत होत्या. या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. 26 फेब्रुवारी रोजी सोने 160 रुपयांनी स्वस्त झाले. मंगळवारी हाच भाव कायम होता. 28 फेब्रुवारीला किंचित 10 रुपयांची घसरण झाली. 29 फेब्रुवारीला किंमतीत बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,740 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,980 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा युटर्न
दोन आठवड्यात चांदी 3400 रुपयांनी स्वस्त झाली. या आठवड्याच्या सुरुवातीलाच 26 फेब्रुवारीला चांदी 400 रुपयांनी स्वस्त झाली. 27 फेब्रुवारीला 500 रुपयांची पडझड झाली. 28 फेब्रुवारी रोजी 100 रुपयांनी किंमत उतरली. 29 फेब्रुवारी रोजी 300 रुपयांनी किंमती वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,200 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने स्वस्त झाले आणि चांदीचा भाव उतरला. 24 कॅरेट सोने 62,241 रुपये, 23 कॅरेट 61,992 रुपये, 22 कॅरेट सोने 57,013 रुपये झाले. 18 कॅरेट 46,681रुपये, 14 कॅरेट सोने 36,411 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 69,312 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.