नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : डॉलरच्या कमकुवतपणाच सोने-चांदीने चांगला फायदा करुन घेतला. जागतिक बाजारात डॉलर घसरला. त्यानंतर सोने-चांदीचा आलेख उंचावला. ऑगस्ट महिन्यात अनेक दिवस भावात घसरण होती. पण 21 ऑगस्टनंतर सोने-चांदीने उचल खाल्ली. हे दोन्ही धातू आगेकूच करत आहे. गेल्या तीन दिवसांत तर सोन्यासह चांदीने मोठा पल्ला गाठला. गुरुवारी 24 कॅरेट सोन्यात 160 रुपयांची वाढ झाली. सोने 60,160 रुपये प्रति ग्रॅमवर पोहचले. तर एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपयांवर पोहचला. गुडरिटर्न्सनुसार गेल्या तीन दिवसांत सोने-चांदीने मोठी भरारी घेतली. सप्टेंबर महिन्यात सणांची रेलचेल आहे, या काळात सोने-चांदी (Gold-Silver Price Today 1 September 2023) यापूर्वीचे रेकॉर्ड मोडते का हे समोर येईल.
शेवटी केलीच करामत
गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्टच्या अखेरच्या सत्रात सोन्याने मोठी करामत केली. ऑगस्टच्या पहिल्या आणि पाचव्या दिवसी सोने वधारले. भावात 100-150 रुपयांची वाढ झाली. त्यानंतर घसरण काही थांबली नाही. त्याला पहिला ब्रेक 21 ऑगस्ट रोजी मिळाला. सोने 50 रुपयांनी वाढले. 23, 24 ऑगस्ट रोजी किंमती अनुक्रमे 180, 200 रुपयांनी वाढल्या. 29 ऑगस्ट रोजी 250 रुपयांची दरवाढ झाली. 30 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची वाढ झाली. 31 ऑगस्ट रोजी 160 रुपयांनी किंमती वधारल्या. 22 कॅरेट सोने 55,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,310 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.
चांदीची पण चढाई
चांदीन पण ब्रेकनंतर चांगलीच चढाई केली. 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. 18 ऑगस्टला 1000 रुपयांनी किंमती वाढल्या. 19, 21 ऑगस्ट रोजी चांदी 200 रुपयांचा चढ-उतार दिसून आला. 22 ऑगस्ट रोजी 1300 रुपयांनी किंमती वाढल्या. 23 ऑगस्ट रोजी 500, 24 ऑगस्ट रोजी 1600, 26 ऑगस्टला 500, 29 ऑगस्टला 200 आणि 30 ऑगस्ट रोजी 500 रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 77,600 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 59,485 रुपये, 23 कॅरेट 59,247 रुपये, 22 कॅरेट सोने 54,488 रुपये, 18 कॅरेट 44614 रुपये, 14 कॅरेट सोने 34,799 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 74,645रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते.