Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीत पुन्हा घसरण

| Updated on: Aug 10, 2023 | 9:32 AM

Gold Silver Rate Today : जागतिक बाजारात सोने-चांदी पुन्हा दबावाखाली आले आहे. त्याचा परिणाम देशातील सराफा बाजारात दिसत आहे. सोने-चादींच्या किंमतीत इतकी घसरण झाली. खरेदीदारांना दिलासा मिळाला.

Gold Silver Rate Today : खरेदीची करा लगबग, सोने-चांदीत पुन्हा घसरण
Follow us on

नवी दिल्ली | 10 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोने-चांदी पुन्हा दबावाखाली आले आहे. दोन्ही धातू आठवड्याच्या निच्चांकावर आहेत. अमेरिकन केंद्रीय बँकेने केलेल्या उपायांचा हा परिपाक म्हणता येईल. फेडरल रिझर्व्हने महागाईच्या नाड्या कसल्या. परिणामी डॉलर मजबूत झाला. गंगाजळीत आवक वाढली. दुसरीकडे चीनमध्ये अभूतपूर्व परिस्थिती उद्भवली. बाजारात मागणी घसरल्याने देशावर संकट कोसळले आहे. या घडामोडींचा फटका सोने-चांदीला बसत आहे. दोन्ही धातूत घसरणीचे सत्र सुरु आहे. जुलै महिन्यात सोने-चांदीला बळ मिळाले होते. पण ऑगस्ट महिन्यात घसरण सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने 500 रुपयांनी तर चांदी 3,000 रुपयांनी घसरली होती. तर या आठवड्याच्या चौथ्या दिवशी सोने-चांदीत (Gold Silver Price Today) पडझड सुरुच आहे.

स्वस्ताईची वर्दी

ऑगस्ट महिना सोने-चांदी खरेदीदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी फायदाचा ठरला. दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण झाली.गुडरिटर्न्सनुसार, ऑगस्ट महिन्यात 1 ऑगस्ट रोजी सोन्याने 150 रुपयांची उसळी घेतली. 2 ऑगस्ट रोजी सोन्यात 300 रुपयांची घसरण झाली. 3 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी किंमती कमी झाल्या. 4 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 5 ऑगस्ट रोजी सोने 200 रुपयांनी वधारले. 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. तर 8 ऑगस्ट रोजी सोन्यात 100 रुपयांची घसरण झाली. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा 100 रुपयांची स्वस्ताई आली. 22 कॅरेट सोने 55,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,110 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत 1600 रुपयांची घसरण

या आठवड्यात चांदीने स्वस्ताई आणली. सोमवारी चांदीत घसरण दिसून आली. 100 रुपयांनी या किंमती घसरल्या. मंगळवारी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. बुधवारी 500 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. तीन दिवसांत या किंमतीत 1600 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 74,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,137 रुपये, 23 कॅरेट 58,901 रुपये, 22 कॅरेट सोने 54,169 रुपये, 18 कॅरेट 44,352 रुपये, 14 कॅरेट सोने 34,595 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,127 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित

ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.