Gold Silver Rate Today | चांदी 2300 रुपयांनी महाग, सोन्यात ही मोठी दरवाढ, किंमती काय

| Updated on: Mar 10, 2024 | 8:40 AM

Gold Silver Rate Today 10 March 2024 | सोन्याने या आठवड्यात उंच भरारी घेतली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात तुफान बॅटिंग केली. चांदीने पण तुफान बॅटिंग केली. या आठवड्यात चांदी 2300 रुपयांनी महागली. या दरवाढीने ग्राहकांना मोठा फटका बसला. त्यांच्या खिशावर ताण आला.

Gold Silver Rate Today | चांदी 2300 रुपयांनी महाग, सोन्यात ही मोठी दरवाढ, किंमती काय
सोने महाग, चांदीचा टॉप गिअर
Image Credit source: गुगल
Follow us on

नवी दिल्ली | 10 March 2024 : डिसेंबरनंतर मार्च महिन्यात सोने आणि चांदीने ग्राहकांना आस्मान दाखवले. मौल्यवान धातूंनी त्यांच्या तोंडचे पाणी पळवले. अवघ्या दहा दिवसांतच दोन्ही धातूंनी मोठा पल्ला गाठला. सोने दहा दिवसांत 3,430 रुपयांनी वधारले. तर चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. दोन्ही धातूंनी तुफान फटकेबाजी केली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण सोन्याने षटकार हाणलाच. या आठवड्यात सोने सातत्याने चढेच होते. तर चांदीत चढउताराचे सत्र होते. आता सोने-चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 10 March 2024)..

सोने महागले

मार्च महिन्यात सोन्याने तुफान फटकेबाजी केली. या दहा दिवसांत आणि या आठवड्यात सोने महागले. तर या महिन्यात 3,430 रुपयांची दरवाढ झाली. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागले. 1 मार्चला 310 तर 2 मार्च रोजी 850 रुपयांनी किंमती वाढल्या. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर 5 मार्च रोजी 700 रुपयांची वाढ झाली. 6 मार्च रोजी 250 रुपयांनी सोने महागले. तर 7 मार्च रोजी त्यात 400 रुपयांची भर पडली. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. 9 मार्च रोजी 540 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,420 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची 2300 रुपयांची वाढ

मार्चमध्ये चांदी जवळपास 3 हजारांनी महागली. तर या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. 1 मार्च रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 2 मार्च 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 3 मार्चला 1400 रुपयांची स्वस्ताई आली. तर 5 मार्च रोजी चांदी 1100 रुपयांनी महागली. 6 मार्च रोजी 200 रुपयांची स्वस्ताई आली. 7 मार्च रोजी 500 रुपयांनी किंमती वाढल्या. 8 मार्च रोजी चांदीत इतकीच वाढ झाली. 9 मार्च रोजी 200 रुपयांनी किंमत वाढली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 64,955 रुपये, 23 कॅरेट 64,695 रुपये, 22 कॅरेट सोने 59,499 रुपये झाले.18 कॅरेट 48,716रुपये, 14 कॅरेट सोने 37,999 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 72,265 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.