Gold Silver Rate Today 10 May 2024 : अक्षय तृतीया पावली; सोन्याची स्वस्ताई, 12 वर्षांत गुंतवणूकदारांची झाली ‘चांदी’

| Updated on: May 10, 2024 | 8:39 AM

Gold Silver Rate Today 10 May 2024 : ग्राहकांना अखेर Akshaya Tritiya 2024 पावली. त्यांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. गेल्या 12 वर्षांत अक्षय तृतीयाच्या दिवशी सोन्याच्या किंमतींवर नजर टाकता, आता ग्राहकांना दुप्पटीहून अधिक परतावा मिळाला आहे.

Gold Silver Rate Today 10 May 2024 : अक्षय तृतीया पावली; सोन्याची स्वस्ताई, 12 वर्षांत गुंतवणूकदारांची झाली चांदी
सोन्यात स्वस्ताई, चांदी वधारली
Follow us on

Akshaya Tritiya 2024 रोजी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते. या आठवड्यात सोन्याच्या किंमतींनी डोके वर काढले होते. पण दोन दिवसांपासून मौल्यवन धातूने ग्राहकांन दिलासा दिला. किंमती कमी झाल्याने ग्राहकांची पावले सराफा बाजाराकडे वळली. चांदीने या आठवड्यात दरवाढीची आघाडी उघडली आहे. या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी वधारली. गेल्या 12 वर्षांतील अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याच्या किंमतीचा विचार करता खरेदीदार, गुंतवणूकदारांना दुप्पटीहून अधिकचा परतावा मिळाल्याचे दिसून येते. या स्वयंसिद्ध मुहूर्तावर अशा आहेत सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 10 May 2024 )

सोन्याचा दिलासा

या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या महागाईने झाली. 6 मे रोजी सोने 200 रुपयांनी वाढले. 7 मे रोजी त्यात अजून 330 रुपयांची भर पडली. 8 मे रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. तर 9 मे रोजी त्यात तितकीच घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,320 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची उसळी

17 एप्रिलपासून चांदीचा ग्राहकांना दिलासा आहे. तर या आठवड्यात चांदी 2200 रुपयांनी महागली. 6 आणि 7 मे रोजी किंमतीत प्रत्येकी 1 हजारांची भर पडली. 8 मे रोजी किंमती स्थिर होत्या. 9 मे रोजी त्यात 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने स्वस्त झाले तर चांदी महागली. 24 कॅरेट सोने 71,502 रुपये, 23 कॅरेट 71,216 रुपये, 22 कॅरेट सोने 65,496 रुपये झाले. 18 कॅरेट 53,627 रुपये, 14 कॅरेट सोने 41,829 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 82,342 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

12 वर्षांत भाव दुप्पटीहून जास्त

  1. गेल्या 12 वर्षांत सोन्याचे भाव दुप्पटीहून जास्त वधारले. भावांवर नजर टाकल्यास किती फायदा झाला हे स्पष्ट होईल.
  2. 24 एप्रिल 2012 रोजी अक्षय तृत्तीयेला सोन्याचा भाव 29,030 रुपये प्रति 10 ग्रॅम होता
  3. 13 मे 2013 रोजी अक्षय तृत्तीयेला एक तोळा सोन्याचा भाव 29,865 रुपये होता
  4. एका वर्षांत ग्राहकांना केवळ 2.88 टक्क्यांचा परतावा मिळाला होता.
  5. आजच्या भावाशी तुलना करता 43,270 रुपये प्रति 10 ग्रॅमचा फायदा झाला.
  6. चांदीने या काळात ग्राहकांना फटका दिला. चांदी जवळपास 19 टक्क्यांनी स्वस्त झाली.
  7. चांदी 56,697 रुपयांहून 45,118 रुपये किलो झाली. 10,579 रुपये प्रति किलोने चांदी स्वस्त झाली.
  8. आजच्या चांदीच्या किंमतीचा विचार करता किलोमागे गुंतवणूकदारांना 40,082 रुपयांचा फायदा झाला.