गणेशोत्सवाच्या काळातच महालक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे घरात चैतन्य ओसंडून वाहते. महिला वर्गासोबतच पुरुष मंडळींची सजावटीसह इतर साहित्य आणण्यासाठी लगबग उडालेली आहे. सोने आणि चांदीच्या आघाडीवर सुद्धा ही लगबग दिसून येत आहे. सोने स्वस्त झाले आहे. तर चांदीने उसळी घेतली आहे. सणासुदीत मौल्यवान धातूत दरवाढीचे सत्र असते. बाप्पाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरी तीन दिवस मुक्कामी असल्याने सराफा बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसू शकते. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 10 September 2024 )
सोन्यात आली स्वस्ताई
गेल्या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात 6 सप्टेंबर रोजी सोन्याने 550 रुपयांची मुसंडी मारली होती. त्यापूर्वी किंमतीत घसरणीचे सत्र होते. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली. तर दुसऱ्या दिवशी सोने 440 रुपयांनी उतरले. सोमवारी, 9 सप्टेंबर रोजी किंमती स्थिर होत्या. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी इतकी वधारली
मागील काही दिवसांपासून चांदीत मोठी घसरण दिसून येत आहे. 6 सप्टेंबर रोजी चांदी 2 हजार रुपयांनी उसळली. 7 सप्टेंबर रोजी 2,500 रुपयांनी किंमती उतरल्या. तर सोमवारी 9 सप्टेंबर रोजी किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,378, 23 कॅरेट 71092, 22 कॅरेट सोने 65,382 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,534 रुपये, 14 कॅरेट सोने 41,756 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 81,480 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.