नवी दिल्ली | 11 February 2024 : सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला. बजेटनंतर सोने अजून महागणार असा व्होरा व्यक्त करणारे पंडित अचानक गायब झाले आहेत. आता सोने-चांदीच्या बाजाराला अजून बजेट कळले नसल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तर सोन्याने या आठवड्यात मोठा दिलासा दिला. सोने या आठवड्यात 600 रुपयांनी स्वस्त झाले तर त्यात एकदाच 180 रुपयांची दरवाढ झाली. चांदी 1000 रुपयांनी स्वस्त झाली तर एकदाच 500 रुपयांनी वधारली. आता असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 11 February 2024)
सोन्याचा मोठा दिलासा
या महिन्याच्या सुरुवातीला 1 आणि 2 फेब्रुवारीला अनुक्रमे 170 आणि 160 रुपयांची दरवाढ झाली होती. 3 फेब्रुवारीला 220 रुपयांनी, 5 फेब्रुवारीला 150 रुपयांनी तर 6 फेब्रुवारीला 220 रुपयांनी सोन्यात घसरण झाली. 7 फेब्रुवारी सोने 180 रुपयांनी महागले. 9 फेब्रुवारीला 20 तर 10 फेब्रुवारी रोजी 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची दरवाढ
या महिन्यात 2 फेब्रुवारी रोजी चांदी 200 रुपयांनी महागली. 3 फेब्रुवारी रोजी भाव 1,000 रुपयांनी उतरले. 5 फेब्रुवारीला 300 तर 6 फेब्रुवारी किंमती 700 रुपयांनी उतरल्या. 7 आणि 8 फेब्रुवारीला किंमती जैसे थे होत्या. 9 फेब्रुवारी रोजी 500 रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 75,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 62,624 रुपये, 23 कॅरेट 62,373 रुपये, 22 कॅरेट सोने 57,364 रुपये झाले. 18 कॅरेट 46,968 रुपये, 14 कॅरेट सोने 36,635 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,638 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.