सोने आणि चांदीने पितृपक्षात मोठी उलाढाल केली. त्यानंतर पण मौल्यवान धातुची चढाई सुरूच होती. या काळात यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा झाले. त्यामुळे ऐन सणासुदीत सोने 80 हजारांच्या तर चांदी 1 लाखांच्या घरात जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. या आठवड्यात दोन्ही धातुची दाणादाण उडाली. किंमतीत मोठी स्वस्ताई आली. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला. दोन युद्ध, अमेरिकन केंद्रीय बँकेचा व्याजदर कपातीचा निर्णय आणि इतर कारणांमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउतार दिसत आहे. आता अशा आहेत दोन्ही धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 11 October 2024 )
या आठवड्यात सोन्याचा मोठा दिलासा
मागील दोन आठवड्यात सोने 2300 रुपयांनी वधारले. या आठवड्यात मात्र सोन्याला सूर गवसला नाही. सोमवारी, 7 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी उतरले. मंगळवारी भाव जैसे थे होते. 9 ऑक्टोबर रोजी सोने 760 रुपयांनी तर त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी त्यात किंचित घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,400 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 76,790 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत 3 हजारांची घसरण
29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झाला नाही. तर या 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी चांदीत 2 हजारांची वाढ झाली. या आठवड्याची सुरुवात घसरणीने झाली. सोमवारी भाव जैसे थे होते. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी घसरली. तर आज सकाळी सुद्धा चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,900 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,838, 23 कॅरेट 74,538, 22 कॅरेट सोने 68,552 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,129 रुपये, 14 कॅरेट सोने 43,780 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,353 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.