लग्नसराई हंगामात सोने आणि चांदीने महागाईचा मुहूर्त गाठला आहे. दोन्ही धातुनी या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्याचे दिसते. या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने तडाखेबंद कामगिरी केली. तर दुसरीकडे चांदीने काल महागाईचा ठेका धरला. दोन्ही धातुमधील उसळीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र होते. तर या आठवड्यात दोन्ही धातुनी दरवाढीचा सूर आळवला आहे. वायदे बाजारात सुद्धा दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने वधारण्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. त्याचा परिणाम भारतीय बाजारपेठेत आता दिसत आहे. या वर्षाअखेर आता सोने 85 हजारांचा टप्पा ओलांडते का? याकडे तज्ज्ञांचे लक्ष लागेल आहे. अमेरिकेतली घडामोडींचा मोठा परिणाम बेशकिंमती धातुच्या दरवाढीवर होईल. या दोन मौल्यवान धातुची आता अशी आहे किंमत (Gold Silver Price Today 13 December 2024 )
सोन्याची जवळपास 2 हजारांची उसळी
या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याने जवळपास दोन हजार रुपयांची उसळी घेतली आहे. गेल्या आठवड्यात दोन्ही धातुत चढउताराचे सत्र दिसले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने धमाका केला. 9 डिसेंबर रोजी सोने 160, 10 डिसेंबरला 820 रुपये तर 11 डिसेंबर रोजी 870 रुपयांनी सोने महागले. काल सोन्याच्या भावात बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 73,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 79,620 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी पाच हजारांनी महाग
या आठवड्यात चांदी या आठवड्यात चांदी 10 डिसेंबर रोजी 4500 रुपयांनी वधारली. तर बुधवारी एक हजारांनी किंमती उतरल्या. गुरुवारी किंमती हजारांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,600 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,147, 23 कॅरेट 77,834, 22 कॅरेट सोने 71,583 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,610 रुपये, 14 कॅरेट सोने 45,716 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 93,300 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.