डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर आल्यापासून व्यापार आणि व्यावसायिक जगतात अनेक घडामोडी घडत आहे. पहिल्यांदाच डॉलर इंडेक्स मजबुतीने पुढे सरकारला आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारावर दिसून येत आहे. सोने आणि चांदीची मागणी कमी झाली आहे. तर रशिया-युक्रेन युद्ध तर मध्य-पूर्वेतील इस्त्रायल विरुद्ध हमास, हिजबुल्ला आणि इराण आघाडीचे युद्ध थांबवण्यावर चर्चा सुरू झाली आहे. तसे झाले तर मौल्यवान धातुचा भाव खाली येण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे ट्रम्प आल्यानंतर व्यापार आणि व्यावसायिक जगतात मोठ्या घडामोडी घडत आहेत. डॉलर निर्देशांक वधारला आहे. अनेक दिवसानंतर त्याची मजबूत चाल सुरू आहे. जागतिक आणि स्थानिक सराफा बाजारपेठेत बेशकिंमती धातुच्या किंमती उतरल्या आहेत. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 13 November 2024 )
सोन्यात मोठी पडझड
या आठवड्यात सोन्याच्या किंमती जोरात आपटल्या. सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले होते. तर मंगळवारी किंमतीत पुन्हा मोठी घसरण झाली. सोने धपकन खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,440 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत मोठी घसरण
मागील आठवड्यात चांदीत काहीच हालचाल झाली नाही. चांदीत 4 हजारांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. मंगळवारी चांदीत 2 हजारांची स्वस्ताई आली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 74,900, 23 कॅरेट 74,600, 22 कॅरेट सोने 68,608 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,175रुपये, 14 कॅरेट सोने 43,817 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,252 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.