गेल्या 15 दिवसांत सोने आणि चांदीत कमालीची वाढ आणि घसरण दिसून आली. पितृपक्षात दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली होती. पितृपक्षात एरव्ही किंमती उतरतात. पण यावेळी हिजबुल्लाह-इराण आणि इस्त्रायल युद्ध भडकल्याने इकडे भाव वधारला. तर या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातुत मोठी घसरण दिसली. तर अखेरीस दसऱ्याला मौल्यवान धातुने मोठी भरारी घेतली. दोन्ही धातुच्या किंमतीत मोठी वाढ झाली. त्यामुळे साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरील खरेदी खिसा कापणारी ठरली. असा आहे आता सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 13 October 2024 )
सोने वधारणार?
सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत. तर तिकडे मध्य-पूर्वेतील आघाडीवर अजून युद्ध भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत सोने महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात सोने 1 हजार रुपयांनी वाढले. 7 आणि 9 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे 220 आणि 760 रुपयांनी भाव उतरला. तर 11 ऑक्टोबर रोजी 760 रुपयांची मुसंडी सोन्याने मारली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी गाठणार एक लाखाचा टप्पा
मागील 15 दिवसांत चांदीत मोठी अपडेट दिसली नाही. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. सोमवारी भाव जैसे थे होते. 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. तज्ज्ञांच्या मते चांदी दिवाळीपर्यंत एक लाखाचा टप्पा गाठू शकते. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,623, 23 कॅरेट 75,320, 22 कॅरेट सोने 69,271 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,717 रुपये, 14 कॅरेट सोने 44,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,963 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.