Gold Silver Rate Today 14July 2024 : सोने-चांदीची काय अपडेट, किती वाढल्या किंमती, किती बसली खिशाला झळ

| Updated on: Jul 14, 2024 | 10:10 AM

Gold Silver Rate Today 14 July 2024 : या आठवड्यात सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र होते. सुरुवातीला घसरणीवर असणाऱ्या मौल्यवान धातूंनी नंतर तुफान उसळी घेतली. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात अशी आहे दोन्ही धातूंची कामगिरी

Gold Silver Rate Today 14July 2024 : सोने-चांदीची काय अपडेट, किती वाढल्या किंमती, किती बसली खिशाला झळ
सोने-चांदीची काय खबरबात
Follow us on

जुलै महिन्याच्या या 14 दिवसांत सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसले. चांदीने या काळात जोमदार कामगिरी केली. चांदीत मोठी उसळी दिसली. चांदी 5 हजारांपेक्षा अधिकने वधारली. तर सोन्याने पण 2,000 रुपयांहून अधिकची वाढ नोंदवली. या आठवड्यात चांदीला दमदार कामगिरी करता आली नाही. केवळ 1200 रुपयांनी किंमत वधारली. तर सोने या आठवड्यात 550 रुपयांनी महागले. आता काय आहेत मौल्यवान धातूंच्या किंमती?(Gold Silver Price Today 14 July 2024 )

सोन्यात काय अपडेट

या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्यात 600 रुपयांची घसरण झाली. त्यानंतर सोने 550 रुपयांनी वधारले. तर आठवड्याच्या अखेरीस मौल्यवान धातूला कोणतीही मोठी कामगिरी करता आली नाही. आठवड्याच्या अखेरीस मुसंडी मारण्याचा ट्रेंड दिसला नाही. सोने 8 जुलैला 220 आणि 9 जुलैला सोने 380 रुपयांनी उतरले. तर 11 जुलैला सोने 220 रुपयांनी वाढले. 12 जुलै रोजी सोने 330 रुपयांनी वधारले. त्यानंतर सोन्याच्या आघाडीवर शांतता आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची काय अपडेट

जुलै महिन्यात चांदीने दमदार बॅटिंग केली. चांदी जवळपास 6,000 रुपयांनी वधारली. या आठवड्यात 8 जुलैला चांदी 200 रुपयांनी वाढली. तर 9 जुलै रोजी 500 रुपयांनी उतरली. 11 जुलैला चांदी 1 हजारांनी महागली. त्यानंतर किंमतीत अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने महागले तर चांदी उतरली. 24 कॅरेट सोने 72,664 रुपये, 23 कॅरेट 72,373 रुपये, 22 कॅरेट सोने 66,560 रुपये झाले. 18 कॅरेट 54,498 रुपये, 14 कॅरेट सोने 42,508 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 91,827 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.