नवी दिल्ली | 14 March 2024 : 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीत तुफान तेजी आली. या तेजीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातूचा आलेख एकदम चढता होता. दणदण दर वधारले. अवघ्या काही तासांत धातूंनी मोठा पल्ला गाठला. या भयावह दरवाढीने ग्राहकांचा पार हिरमोड झाला. पण या आठवड्यात दरवाढीला ब्रेक लागला. या तीन दिवसांत भावात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. आता अशा आहेत सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 14 March 2024)..
सोने फिरले माघारी
या महिनाच्या सुरुवातीला, दहा दिवसांत सोन्याने 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांची आघाडी घेतली. गेल्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात पण दरवाढीची सलामी मिळाली. या आठवड्यात दरवाढीच्या आघाडीवर शांतता दिसून आली. 10-11 मार्च रोजी किंमती स्थिर होत्या. 12 मार्च रोजी किंमती किरकोळ 10 रुपयांनी कमी झाल्या. 13 मार्च रोजी यामध्ये 420 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत आपटी बार
मार्च महिन्यातील सुरुवतीच्या दहा दिवसांत चांदीने 3 हजारांची चढाई केली. तर या आठवड्यात सोमवारी पहिल्या दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली. तर 12 मार्च रोजी 500 रुपयांनी दरवाढ झाली. 13 मार्च रोजी 900 रुपयांची मोठी घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,200 रुपये आहे.