गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूने दिलासा दिला होता. पण अक्षय तृतीयाला बेशकिंमती धातूंनी महागाईचा मुहूर्त गाठला. सोने-चांदी खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकांना प्रति ग्रॅम आणि प्रति किलो जादा रक्कम मोजावी लागली. ग्राहकांचा हिरमोड झाला. तर अखेरच्या सत्रात दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण दिसली. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली. दोन्ही धातूत घसरण दिसली. आता सोने आणि चांदीची काय आहे किंमत (Gold Silver Price Today 14 May 2024 )
सोन्यात स्वस्ताई
गेल्या आठवड्यात सोने 2050 रुपयांनी वधारले. 10 मे रोजी सोन्याने 1530 रुपयांची उंच भरारी घेतली. अखेरच्या सत्रात सोने 330 रुपयांनी घसरले. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने आनंदवार्ता दिली. 13 मे रोजी सोने 100 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीत झाली घसरण
गेल्या आठवड्यात चांदी 4700 रुपयांनी महागली. 10 मे रोजी चांदीने 2500 रुपयांचा पल्ला गाठला. 11 मे रोजी 700 रुपयांनी चांदी नरमली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला 13 मे रोजी चांदीत 500 रुपयांची स्वस्ताई आली.
गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 86,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीत स्वस्ताई आली. 24 कॅरेट सोने 72,164 रुपये, 23 कॅरेट 71,875 रुपये, 22 कॅरेट सोने 66,102 रुपये झाले. 18 कॅरेट 54,123 रुपये, 14 कॅरेट सोने 42,216 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,494 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.