Gold Silver Rate Today 14 November 2024 : खरेदीची करा घाई, अशी संधी पुन्हा नाही; तीन दिवसांत सोने-चांदीचा घसरणीचा विक्रम, भाव आले जमिनीवर

| Updated on: Nov 14, 2024 | 8:29 AM

Gold Silver Rate Today 14 November 2024 : डोनाल्ड ट्रम्प सध्या सोने आणि चांदी ग्राहकांना पावले असे म्हटले तर वावगे ठरू नये. बायडेन सरकार गेल्यावर ट्रम्प यांनी अमेरिकेतील सत्तेची सूत्र हाती घेतली. त्याचा मोठा परिणाम जागतिक बाजारावर दिसून आला. डॉलर निर्देशांक मजबूत झाला. तर सोने आणि चांदी नरमले.

Gold Silver Rate Today 14 November 2024 : खरेदीची करा घाई, अशी संधी पुन्हा नाही; तीन दिवसांत सोने-चांदीचा घसरणीचा विक्रम, भाव आले जमिनीवर
सोने आणि चांदी भाव
Follow us on

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेतल्यानंतर मोठे बदल झाले आहेत. त्यांनी जागतिक अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या मदतीने काही योजना आखल्या आहेत. त्याचे पडसाद जागतिक बाजारात लवकरच दिसतील. पण डॉलर निर्देशांक मजबूत दिशेने जात असल्याने सोने आणि चांदीच्या किंमतीवर त्याचा परिणाम दिसून आला आहे. त्यातच दक्षिण पूर्व आशियातून होणारी सोन्याची मागणी कमी झाली आहे. या सर्व घडामोडींचा अनुकूल परिणाम ग्राहकांच्या पथ्यावर पडला आहे. या दोन्ही धातुच्या किंमती घसरल्या आहेत. सराफा बाजारात अशी आहे सोने आणि चांदीची किंमत (Gold Silver Price Today 14 November 2024 )

सोन्यात पडझडीचे सत्र

या आठवड्यात 11 नोव्हेंबर रोजी सोने 600 रुपयांनी आपटले. दुसऱ्या दिवशी मंगळवारी त्यात 147 रुपयांची तर तिसऱ्या दिवशी, बुधवारी 13 नोव्हेंबर रोजी 440 रुपयांनी भाव उतरला. या तीन दिवसांत सोने 1200 रुपयांनी उतरले. तर आज सकाळच्या सत्रात सुद्धा सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 70,060 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत आपटी बार

गेल्या आठवड्यात चांदी सुस्तावली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. मंगळवारी चांदी 2 हजारांची उतरली. बुधवारी भावात बदल झाला नाही. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,260, 23 कॅरेट 74,959, 22 कॅरेट सोने 68,938 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,445 रुपये, 14 कॅरेट सोने 44,027 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 89,747 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.