मकर संक्रांतीला देशभरासह जळगाव सराफ बाजारात सोने आणि चांदीची महागाईची पतंग हवेत होती. जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभरात सोने प्रतितोळा 1000 तर चांदी 2 हजार रुपयांनी महागली होती. काल सोने जीएसटीसह 81,164 रुपये तर चांदी 92 हजार रुपयांवर पोहोचली आहे. ग्राहक राजाला हा नवीन दर ऐकून घाम फुटला होता. त्याला काल जादा पैसे मोजावे लागले. सणाचा महिमा संपताच ही पतंग जमिनीवर आली. काल एका झटक्यात भाव उतरले. या दोन्ही धातुत इतकी आली स्वस्ताई…
भावात घसरण
जळगावातील सराफ बाजारात चांदीच्या भावात संक्रांतीला एक हजार 800 रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे भाव 89 हजार 500 रुपये प्रति किलोवर आले. सोने भावदेखील ३०० रुपयांनी कमी होऊन ते 78 हजार 500 रुपये तोळ्यावर आले.
शनिवारी 91 हजार 300 रुपयांवर असलेली चांदी मंगळवारी 1800 रुपयांची घसरण होऊन 89 हजार 500 रुपये प्रति किलोवर आली. दुसरीकडे शनिवारी 78 हजार 600 रुपयांवर असलेल्या सोने भावात सोमवारी 200 रुपयांची वाढ होऊन ते 78 हजार 800 रुपयांवर पोहचले. सोमवारी मात्र त्यात 300 रुपयांची घसरण होऊन ते 78 हजार 500 रुपये प्रति तोळ्यावर आले.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 78,028, 23 कॅरेट 77,716, 22 कॅरेट सोने 71,474 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 58,521रुपये, 14 कॅरेट सोने 45,646 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 88,730 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.