गेल्या दोन आठवड्यात सोने-चांदीला मोठी भरारी घेता आलेली नाही. मौल्यवान धातूत चढउताराचे सत्र आहे. पण कोणताही रेकॉर्ड या काळात नोंदविण्यात आला नाही. गेल्या 10 वर्षांत सोने-चांदीने मोठी झेप घेतली आहे. या काळातील दोन्ही धातूंच्या दरवाढीच्या वेगाने ग्राहक हैराण झाले तर गुंतवणूकदारांची कमाई झाली. ज्यांनी 2014 मध्ये गुंतवणूक केली. ते गुंतवणूकदार आज मालामाल आहेत. गेल्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यातही ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसलेली नाही. घसरणीनंतर अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 15 June 2024 )
सोने झाले स्वस्त
या आठवड्यात सोन्याला 490 रुपयांची घौडदौड करता आली. तर 270 रुपयांची घसरण झाली. 10 जून रोजी भाव स्थिर होता. 11 जूनला 170 रुपये, 12 जूनला 320 रुपयांनी भाव वधारला. तर 13 जूनला शांतता होती. तर 14 जून रोजी 270 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीने नाही दाखवला जोश
या आठवड्यात चांदी 1000 रुपयांनी वधारली. तर 1800 रुपयांनी स्वस्त झाली. 10 जूनला चांदी 200 रुपयांनी तर 11 जूनला 1200 रुपयांनी उतरली. 12 जूनला 800 रुपयांनी चांदी वधारली. 13 जून रोजी भाव 600 रुपयांनी उतरले. 14 जून रोजी 200 रुपयांनी भाव उतरले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने वधारले आणि चांदी स्वस्त झाली. 24 कॅरेट सोने 71,866 रुपये, 23 कॅरेट 71,578 रुपये, 22 कॅरेट सोने 65,829 रुपये झाले. 18 कॅरेट 53,900 रुपये, 14 कॅरेट सोने 42,042 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 87,833रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.