नवी दिल्ली | 16 ऑगस्ट 2023 : ऑगस्ट महिन्याने सणांची वर्दी दिली आहे. त्यासोबतच सोने-चांदीच्या (Gold Silver Price Today) स्वस्ताईची वार्ता पण आली आहे. जुलै महिन्यात दोन्ही धातूंचा तोरा वाढला होता. दोन्ही धातूत चांगलीच वृद्धी झाली होती. जुलै नंतर ऑगस्ट महिन्यात पण किंमती भडकण्याचा अंदाज वर्तविण्यातय येत होता. पण हा अंदाज फोल ठरला. आता पंधरावाडा उलटून गेला आहे. या काळात दरवाढीपेक्षा घसरणीचीच वार्ता हाती आली. मे आणि जून महिन्यात पण सोने-चांदीला रेकॉर्ड करता आल्या नव्हत्या. गेल्या वर्षी दिवाळीनंतर सोने-चांदीत मोठी उसळी घेतली होती. फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यात दरवाढीत नवीन रेकॉर्ड झाला होता. मे-जूनने दरवाढीला ब्रेक लावला. तर जुलै महिन्यात पुन्हा भाव वाढले. आता ऑगस्ट महिन्यात किंमतींना मोठा पल्ला गाठता आला नाही. उलट सोने-चांदी माघारी फिरले आहेत.
आयबीजेएकडून भाव जाहीर नाही
भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.
घसरणीचे सत्र सुरुच
गेल्या दोन आठवड्यात सोने 1000 रुपयांनी घसरले. या काळात सोन्यात दोनदा वाढ झाली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. सोन्यात त्यानंतर सतत घसरण झाली. शनिवार, रविवार आणि मंगळवारी राष्ट्रीय सुट्टी आल्याने भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने भाव जाहीर केलेले नाही. गुडरिटर्न्सने सोने-चांदीचे भाव जाहीर केलेले आहे.
अशी आली स्वस्ताई
गेल्या आठवड्यात 6,7 ऑगस्ट रोजी मोठी दरवाढ झाली नाही. 8 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली. 10 ऑगस्ट रोजी 250 रुपयांनी तर 11 ऑगस्ट रोजी सोने 150 रुपयांनी स्वस्त झाले. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 22 कॅरेट सोने 54,700 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,660 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
चांदीत मोठी घसरण
ऑगस्ट महिन्यात चांदीमध्ये मोठी घसरण झाली. 5500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. गेल्या आठवड्यात सोमवारी 100 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. मंगळवारी चांदी 1000 रुपयांनी कमी झाली. बुधवारी चांदीचा भाव 500 रुपयांनी कमी झाला. किंमतीत 2100 रुपयांची घसरण दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,800 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,969 रुपये, 23 कॅरेट 58,733 रुपये, 22 कॅरेट सोने 54,016 रुपये, 18 कॅरेट 44,227 रुपये, 14 कॅरेट सोने 34,497 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,211 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.