नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोन्याची पडझड झाली. डॉलरच्या तुलनेत सोने गेल्या पाच महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले. तर अमेरिकेच्या गंगाजळीत जबरदस्त वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते गेल्या दहा वर्षांतील हा उच्चांक आहे. अमेरिकेत महागाईला लगाम घालण्याचे प्रयत्न कायम राहतील. येत्या काही दिवसात व्याजदर वाढणार नाहीत पण ते कमी पण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली आले आहे. सोन्याची ही पडझड भारतीयांच्या पथ्यावर पडली आहे. भारतीय सराफा बाजारात सोने घसरले तर चांदीत किंचित वाढ झाली आहे. सराफा बाजारात खरेदीदारांनी गर्दी केली आहे. भाव वाढ होण्याअगोदर स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी अनेक जण साधून घेत आहे. काय आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today).
या आठवड्यात इतके घसरले भाव
ऑगस्ट महिन्यातील दोन आठवड्यात सोन्याला सूर गवसला नाही. सोन्यात पडझड झाली. सोन्यात 1200 रुपयांची घसरण दिसून आली. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 54,600 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,550 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
चांदी वधारली
ऑगस्ट महिन्यात चांदीला मोठी उसळी घेता आली नाही. चांदी 5500 रुपयांनी स्वस्त झाली. घसरणीच्या या सत्राला चांदीने ब्रेक दिला. बुधवारी 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,836 रुपये, 23 कॅरेट 58,600 रुपये, 22 कॅरेट सोने 53,894 रुपये, 18 कॅरेट 44,127 रुपये, 14 कॅरेट सोने 34,419 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,241 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.