नवी दिल्ली | 18 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोने-चांदीला (Gold Silver Price Today)सर्वात मोठा फटका बसला आहे. अमेरिकन डॉलरने स्वतःच्या उच्चाकांचे यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. डॉलर गेल्या दोन महिन्यातील उच्चांकावर पोहचला. अमेरिकेतील या घडामोडीचा परिणाम सोने-चांदीवर झाला. दोन्ही धातू दबावा खाली आहे. सोने तर जागतिक बाजारात गेल्या पाच महिन्यांच्या निच्चांकावर पोहचले आहे. अमेरिकेच्या गंगाजळीत गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आवक झाली आहे. महागाईला लगाम घालण्याची कसरत गेल्या वर्षीपासून सुरु होती. त्याचे परिणाम आता दिसून येत आहेत. किंमती घसरल्याने भारतीय सराफा बाजारात खरेदीदारांनी एकच गर्दी केली आहे. भारतात अजूनही किंमती मे-जून महिन्यात इतपत घसरलेल्या नाहीत. जुलै महिन्यातील दरवाढीचे पाठबळ सोन्याला आहे. या किंमती 58000 रुपयांच्या खाली उतरतील तेव्हा इतिहास घडेल. त्यासाठी किती वाट पहावी लागेल, याचे उत्तर काही दिवसांतच मिळेल.
या आठवड्यात 550 रुपयांची घसरण
या आठवड्यात सोन्यात पुन्हा पडझड झाली. भावात जवळपास 550 रुपयांची घसरण झाली. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी सोन्यात मोठी घसरण झाली. किंमती 350 रुपयांनी घसरल्या. या महिन्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली आहे. 1 ऑगस्ट रोजी 150 रुपयांनी सोने वधारले तर 5 ऑगस्ट रोजी सोन्याने 200 रुपयांची उसळी घेतली होती. 22 कॅरेट सोने 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सनुसार, या किंमती अपडेट करण्यात आलेल्या आहेत.
चांदीची चमक फिक्की
ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. बुधवारी घसरणीच्या सत्राला चांदीने ब्रेक दिला होता. 16 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 72,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
24 कॅरेट सोने 58,524 रुपये, 23 कॅरेट 58,290 रुपये, 22 कॅरेट सोने 53,608 रुपये, 18 कॅरेट 43,893 रुपये, 14 कॅरेट सोने 34,237रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,263रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित
ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते.