Gold Silver Rate Today 18 March 2025 : आनंदवार्ता! सोने-चांदीची धुळवड संपली, घसरणीला सुरूवात, भाव तरी काय?

| Updated on: Mar 18, 2025 | 8:32 AM

Gold Silver Rate Today 18 March 2025 : राज्यात हिंसाचाराचे लोण पसरत आहे. तर दुसरीकडे सोने आणि चांदीची धुळवड संपली आहे. दोन्ही धातुत घसरणीला सुरुवात झाली आहे. काही जण मोठ्या घसरणीचा अंदाज वर्तवत आहेत. 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या...

Gold Silver Rate Today 18 March 2025 : आनंदवार्ता! सोने-चांदीची धुळवड संपली, घसरणीला सुरूवात, भाव तरी काय?
सोने आणि चांदीची किंमत
Image Credit source: गुगल
Follow us on

सोने आणि चांदीची खरंच लवकर रया जाणार आहे का? कारण अनेक तज्ज्ञ हे दोन्ही धातु एक मोठा टप्पा गाठून खाली येतील असा दावा करण्यात येत आहे. अर्थात ही केवळ चर्चा आहे. दोन्ही धातुची धुळवड संपली आहे. गेल्या आठवड्यात या दोन्ही धातुनी महागाईचा कहर केला होता. दोन्ही धातुत घसरणीला सुरुवात झाली आहे. काही जण मोठ्या घसरणीचा अंदाज वर्तवत आहेत. आता 18K, 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…(Gold Silver Price Today 18 March 2025 )

तुफान दरवाढीनंतर सोन्यात घसरण

गेल्या आठवड्यात सोन्याने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले. गेल्या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी महागले. तर 330 रुपयांनी भाव कमी झाला. तर या सोमवारी सोने 110 रुपयांनी उतरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 82,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदी थंडावली

गेल्या दोन आठवड्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. चांदी 5 हजारांनी महागली होती. तर 1100 रुपयांनी स्वस्त झाली होती. सोमवारी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,02,900 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 88,101, 23 कॅरेट 87,748 22 कॅरेट सोने 80,701 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 66,076 रुपये, 14 कॅरेट सोने 51,539रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 99,767 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.