गेल्या काही दिवसांपासून चांदीचा सूर हरवला आहे. चांदी मोठी उडी घेण्यासाठी चाचपडत आहे. तर सोन्याने गेल्या काही दिवसांपासून दमदार बॅटिंग केली आहे. चांदीला थोडी धाप लागली आहे. सोने लवकरच 80,000 रुपयांच्या घरात तर चांदी एक लाखांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. जळगाव सराफा बाजारात काल दोन्ही धातुनी ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. सणासुदीत आणि निवडणुकीच्या धामधुमीत दोन्ही धातु मोठी मजल मारणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. आता सोने आणि चांदीची अशी आहे किंमत? (Gold Silver Price Today 18 October 2024 )
तीनच दिवसात सोन्याची मोठी झेप
दिवाळीपूर्वी सोने 80 हजारांच्या घरात जाते की काय अशी स्थिती आहे. जागतिक युद्धाचा परिणाम, चीनकडे गुंतवणूकदारांचा वळालेला मोर्चा आणि भारतीय बाजारपेठेत सणासुदीच्या तडक्यामुळे हा पिवळा धातु वधारला आहे. 15 ऑक्टोबर रोजी सोने 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी सोने 490 रुपयांनी वधारले. 17 सप्टेंबर रोजी त्यात 220 रुपयांची भर पडली. तर आज सकाळच्या सत्रात ही या धातुची दमदार आगेकूच दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीला गवसेना सूर
गेल्या 20 दिवसांत चांदीत मोठी अपडेट दिसली नाही. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वधारली तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी महागली. या आठवड्यात चांदीची कोणतीही खबरबात समोर आलेली नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,810, 23 कॅरेट 76,502, 22 कॅरेट सोने 70,358 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,608 रुपये, 14 कॅरेट सोने 44,934रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 91,600 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.