नवी दिल्ली | 2 February 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी कोणतीही मोठी घोषणा केली नाही. जुलै महिन्यातील पूर्ण बजेटवेळी नवीन सरकार घोषणा करेल. त्याचा परिणाम सराफा बाजारावर पण दिसून आला. दिवाळी 2023 नंतर सोने-चांदीने रॉकेट भरारी घेतली आहे. डिसेंबर महिन्यात तर मौल्यवान धातूच्या किंमतींनी नवीन रेकॉर्ड केला. दोन्ही धातूंनी उच्चांक गाठला. जानेवारी महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today 2 February 2024) घसरण दिसून आली होती. आता बजेटनंतर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला सोने वधारले तर चांदी घसरली आहे.
सोन्याचा भाव वाढला
डिसेंबर 2023 मध्ये सोने-चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या. तर जानेवारीत मौल्यवान धातूत घसरण झाली. जानेवारी महिन्यात सोने 2200 रुपयांनी उतरले. अखेरच्या आठवड्यात त्यात वाढ दिसली. 31 जानेवारी रोजी भाव स्थिर होता. त्यापूर्वी दोन दिवसांत सोने 320 रुपयांनी वधारले. तर 1 फेब्रुवारी रोजी सोने 170 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची चमक फिक्की
जानेवारीत चांदीने ग्राहकांना दिलासा दिला. चांदीत 4400 रुपयांची घसरण झाली. तर जानेवारीच्या शेवटच्या सत्रात चांदीत 2 हजार रुपयांची वाढ झाली होती. 31 जानेवारी रोजी किंमती स्थिर होत्या. 1 फेब्रुवारी रोजी किंमतीत 200 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,300 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदीची किंमत उतरली. 24 कॅरेट सोने 62,599 रुपये, 23 कॅरेट 62348 रुपये, 22 कॅरेट सोने 57,341 रुपये झाले. 18 कॅरेट 46,949 रुपये, 14 कॅरेट सोने 36,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,834 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.