Jalgaon Gold : सुवर्णपेठेत चांदीची तीन हजारांची मुसंडी, तर सोन्याने केली तडाखेबंद सुरुवात, दिवाळीपूर्वीच मौल्यवान धातुत महागाई

| Updated on: Oct 20, 2024 | 1:53 PM

Jalgaon Sarafa Bazar : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने जरबदस्त मुसंडी मारली. जळगावच्या सराफा बाजारात एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांनी वाढ झाली तर सोन्याचे दरात सुद्धा 300 रुपयांनी वाढ झाली आहे. दिवाळीपूर्वीच मौल्यवान धातुनी धमाका केला आहे.

Jalgaon Gold : सुवर्णपेठेत चांदीची तीन हजारांची मुसंडी, तर सोन्याने केली तडाखेबंद सुरुवात, दिवाळीपूर्वीच मौल्यवान धातुत महागाई
सोने आणि चांदीची मुसंडी
Follow us on

जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने जरबदस्त मुसंडी मारली. बाजारात एका दिवसात चांदीच्या दरात तब्बल तीन हजारांनी वाढ झाली तर सोन्याचे दरात सुद्धा 300 रुपयांनी वाढ झाली आहे. या बेशकिंमती धातुत दसऱ्यानंतर जोरदार घोडदौड सुरू आहे. सोन्याच्या भावात चार दिवसात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीने तीन हजार रुपयांची मुसंडी मारली आहे. दिवाळीपूर्वीच मौल्यवान धातुनी धमाका केला आहे. या घाडमोडींमुळे सराफा बाजारात शुकशुकाट आहे. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

सोन्यात चार दिवसांत 2 हजारांची वाढ

जळगाव सोन्याच्या दराने 80 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर चांदीचे दर एक लाख रुपयांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. चांदीत एकाच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ होऊन जीएसटीसह ९८,२८० हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर सोन्याच्या भावातही 300 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचा भाव 80 हजार 546 रुपयांवर पोहचले आहे. सोन्याच्या भावात चार दिवसात दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

युद्धामुळे दरवाढीचा तडका

इराण-इस्रायल वादामुळे सोने पाठोपाठ शनिवारी चांदीच्या भावातही मोठी वाढ झाल्याचं सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर सोन्याने चांदीच्या दारात सातत्याने होत असलेली वाघ यामुळे कुठेतरी ग्राहक चिंतेत पाहायला मिळत आहे. तर दिवाळीसाठी सोना चांदी खरेदी करणारे ग्राहक सततचा भाव वाढीमुळे कुठेतरी खरेदी करायची की थांबायचं असे संभ्रमात असल्याचा पाहयला मिळत आहे. सराफ बाजारामध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,410, 23 कॅरेट 77,100, 22 कॅरेट सोने 70,908 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 58,058 रुपये, 14 कॅरेट सोने 45,285 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,283 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.