नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारासह वायदे बाजारातही (MCX) सोन्या-चांदीच्या किंमतींनी जोरदार मुसंडी मारली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Price) वृद्धी दिसून आली. चीनमध्ये कोरोनाचा (Corona in China) पुन्हा उद्रेक, जपान,अमेरिकेत पुन्हा रुग्णांची वाढ आणि देशात केंद्र सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचनांसाठी आढावा बैठक झाली. या सर्वांचा सकाळाच्या किंमतींवर कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही. पण लवकरच या सर्व घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे गुंतवणूक करताना या सर्व बाबींकडेही तुम्ही लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) चांदीच्या किंमतीत दणकावून वाढ दिसून आली. चांदीच्या किंमती 4 टक्क्यांनी वधरल्या. चांदीचा भाव 24 डॉलर प्रति औसवर व्यापार करत होता. त्यामुळे येत्या काही दिवसात देशातंर्गत चांदीचा दर 75000 रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
भारतीय वायदा बाजारात बुधवारी 21 डिसेंबर रोजी सोने आणि चांदीचा दर (Gold Silver Rate) वधारला होता. वायदे बाजारात (MCX) सुरुवातीच्या सत्रात सोन्याच्या भावात 0.05 टक्क्यांची वाढ झाली. तर चांदीने 0.12 टक्क्यांची उसळी मारली. काल सोन्यात 1.08 टक्के तर चांदीत 3.14 टक्क्यांची वाढ दिसून आली होती.
बुधवारी वायदे बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 25 रुपयांनी वाढला. 10 ग्रॅम सोन्याचा दर 54,923 रुपये होता. सुरुवातीच्या सत्रात हा दर 54,900 रुपये होता. त्यानंतर हा भाव 54,946 रुपयांपर्यत गेला. परंतु, मागणी घसरल्याने भाव 54,923 रुपयांवर अडकला.
वायदे बाजारात चांदीही चमकली. आज चांदीच्या किंमतीत 85 रुपयांची वाढ झाली. चांदी 69,727 रुपये प्रति किलो झाली. पहिल्या सत्रात चांदीचा भाव 69,592 रुपये झाला. त्यानंतर चांदीने जोरदार उसळी घेतली. चांदीचा भाव 69,630 रुपय प्रति किलोवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात 1.56 टक्क्यांची वाढ झाली आणि भाव 1,815.13 डॉलर प्रति औस झाला. तर चांदीच्या दरात 4.44 टक्क्यांची जोरदार भाव वाढ झाली. त्यामुळे येत्या काही दिवसात सोन्यापेक्षा चांदीचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.