नवी दिल्ली | 21 March 2024 : 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने किंमतीत मोठी उसळी घेतली. दोन्ही धातूंच्या किंमती आकाशाला भिडल्या. ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण 10 मार्चनंतर आतापर्यंत दोन्ही धातूंना विक्रमी कामगिरी करता आली नाही. भावात मोठी वाढ झाली तरी तितकीच घसरण पण दिसून आली. सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र आहे. दरवाढीला या काळात ब्रेक लागला. तरीही किंमती अजून चढ्याच आहेत. काय आहे सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 21 March 2024)…
सोन्याचे दोन पाऊल पुढे, दोन पाऊल मागे
या महिन्याच्या सुरुवातीला सोने 3,430 रुपयांनी महागले. त्यानंतर दरवाढीला ब्रेक लागला.
गेल्या आठवड्यात सोने 620 रुपयांनी उतरले. तर या आठवड्यात, 18 मार्च रोजी सोने 210 रुपयांनी उतरले. 9 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वधारली. काल कोणतीच अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदी उतरली
चांदीने या महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत 3 हजारांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 2600 रुपयांची दरवाढ झाली. तर 900 रुपयांची घसरण झाली. .या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. 20 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.