मार्च आणि एप्रिलमध्ये सोने आणि चांदीने दमदार, चमकदार कामगिरी केली. मे महिन्याच्या सुरुवातीच्या 15 दिवसांत मौल्यवान धातूंना कमाल दाखविता आली नाही. पण अक्षय तृतीयेला पहिल्यांदा दोन्ही धातूंनी धमाका केला. 21 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता. तर एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये होता. आता सोन्याने 75 हजारांची झेप घेतली तर चांदीने पण एक लाखांकडे आगेकूच केली. आता सोने आणि चांदीच्या अशा आहेत किंमती (Gold Silver Price Today 21 May 2024 )
सोने सूसाट
गेल्या आठवड्यात सोने जवळपास दोन हजार रुपयांनी महागले होते. तर त्यात 770 रुपयांची घसरण आली होती. या आठवड्याची सुरुवात सोन्याने दरवाढीने केली. सोने 500 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 69,050 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 75,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीची लाखाकडे धाव
21 जानेवारी रोजी एक किलो चांदीचा भाव 75,500 रुपये होता. तर गेल्या आठवड्यात चांदी जवळपास 7,000 रुपयांनी महागली होती. तर 500 रुपयांची घसरण झाली होती. शनिवारी 18 मे रोजी किंमती 3900 रुपयांनी वधारल्या. तर सोमवारी 20 मे रोजी चांदीने 3500 रुपयांची मुसंडी मारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 96,500 रुपये आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीचा भाव अपडेट झालेला नाही. 24 कॅरेट सोने 73,383 रुपये, 23 कॅरेट 73,089 रुपये, 22 कॅरेट सोने 67,219 रुपये झाले. 18 कॅरेट 55,037 रुपये, 14 कॅरेट सोने 42,929 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 86,373 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.